Officials and Muslim brothers of Jama Masjid Trust welcoming Shri Ram Mandir trustees and villagers with bouquets before the procession taken out on the occasion of Shri Ram Navami.  esakal
जळगाव

Positive News : मजहब नहीं सिखाता... आपस में बैर रखना! न्हावी गावाने दिला एकात्मतेचा संदेश...

रवींद्र कोलते

न्हावी (जि. जळगाव) : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेली अनेक गावे आपण पाहिली आहेत. परंतु न्हावी (ता. यावल) गावाने एकात्मतेचा आगळावेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. गावात राममंदिर अन् मशिद समोरासमोर हाकेच्या अंतररावर आहेत. (Hindu Muslim combined names and kirtan on the occasion of Ram Navami in nhavi jalgaon news)

येथे रामनवमीनिमित्त मंदिरात कीर्तन सुरू असताना त्याचवेळी समोर मशिदीत नमाजपठण केले जात होते. एकाच वेळी नमाजपठण आणि कीर्तन झाल्यानंतर मिरवणूक सुरू होण्याअगोदर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन एकमेकांचा सत्कार केला. अशा पद्धतीने हा राष्ट्रीय एकात्मतेचा भाईचारा ‘मजहब नहीं सिखाता..आपस में बैर रखना! जणू हाच संदेश न्हावीवासीयांनी पुन्हा एकदा दिला.

न्हावी हे यावल तालुक्यातील सर्वांत मोठे गाव. या गावाची लोकसंख्या दहा हजारांच्या घरात आहेत. अठरापगड जाती असलेल्या या गावात सर्वधर्मीय बांधव गुण्यागोविंदाने नांदतात. सण हिंदूंचा असो किंवा मुस्लिमांचा येथे नेहमीच एकजुटीचे दर्शन घडते. गावात प्रत्येक सण-उत्सव उत्साहात साजरा केला जातो.

रमजान व श्रीराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फैजपूर पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धार्थ आखेगावकर यांनी शांतता समितीची बैठक घेऊन गावाने यापूर्वीही एकात्मतेचा संदेश जिल्ह्यालाच नव्हे देशाला दिला आहे. याही वेळी तोच आदर्श काय ठेवायचा असल्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

गावात मशिदीजवळ श्रीरामाचे मंदिर आहे. रामनवमीला मंदिराजवळ कीर्तन व मशिदीत नमाजपठण एकाच वेळी सुरू होते. हिंदू बांधव कीर्तनात तल्लीन होते, तर मुस्लिम बांधव नमाजपठण करीत होते. या वेळी दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पडले. हिंदू-मुस्लिम एकत्रित नमाज व रामनवमीमध्ये सर्वांनी भाग घेतला. या वेळी मिरवणुकीत हिंदू -मुस्लिम एकत्रित होते.

गावात मुस्लिम समाजाचा सण उत्सव राहिल्यास रोजा, ईद या सणात हिंदू बांधव शुभेच्छा देतात व त्यांच्या उत्सवात सहभाग घेऊन सहभागी होतात. त्याचप्रमाणे हिंदू बांधवांचा सण राहिल्यास मुस्लिम बांधव शुभेच्छा देतात, अशी या गावांची परंपरा न्हावीवासीयांनी कायम ठेवली.

लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच हेमांगी झोपे, जमा मशिद ट्रस्टी जाफर खान, खजिनदार नशिर खान, उपाध्यक्ष जब्बार खान, राम मंदिर ट्रस्टी अरुण पाटील, बाजीराव कोळी, तुकाराम कोतवाल, विनायक पाटील, ग्रामपंचायत सदस्य गफ्फार मिस्त्री, नदीम पिंजारी, नितीन इंगळे, चेतन इंगळे, रवींद्र तायडे, यशवंत तळेले, प्रभाकर कोळी अक्षय ग्रामीण पतसंस्थचे चेअरमन सुनील फिरके, शिक्षणप्रसारक मंडळाचे चेअरमन शरद महाजन, दूध पतसंस्थचे चेअरमन नितीन चौधरी, पोलिसपाटील संजय चौधरी, अविनाश महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

"न्हावी गावाने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आदर्श घडविला आहे. मशिदीत नमाजपठण अन् राम मंदिरात कीर्तन दोन्ही एकाच वेळी शांततेत सुरू होते. या वेळी हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांचा सत्कार केला. यातून सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडवून आले." - डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस उपअधीक्षक, फैजपूर उपविभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT