crime news  sakal
जळगाव

ऑनर किलिंगने जळगाव हादरलं; भावाकडून बहिणीसह प्रियकराची ह्त्या

सकाळ डिजिटल टीम

Jalgaon Honor Killing : जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात ऑनर किंलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाने त्याच्या बहिणीसह तिच्या प्रियकराची हत्या केली आहे. घटनेत भावाने मुलाला गोळी मारून तर, बहिणीची गळा घोटून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. चोपडा शहरालगत असलेल्या जुना वराड शिवारात या दोघांचेही मृतदेह आढलून आले आहेत. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झाल्याचं सांगितले जात असून, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. या हत्येप्रकरणी दोन अल्पवयीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपूरा चोपडा) अशी मयत युगलांची नावे आहेत. प्रेमप्रकरणातून हे हत्याकांड झालं असल्याचे सांगितले जात असून, ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन अल्पवयिन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेत मुलीच्या भावाने बहिणीचा गळा घोटून तर, तिच्या प्रियकराची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. या दोघांचेही मृतदेह चोपडा शहरालगत असलेल्या जुना वराड शिवारात या आढळून आले आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चोपडा शहर पोलीस स्थानकात रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. त्यात मुलाची गोळी मारून तर मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर दोघांचा शोध सुरु आहे. वर्षा समाधान कोळी (वय २०, रा. सुंदरगगढी, चोपडा ) आणि राकेश संजय राजपूत (वय २२, रा. रामपूरा चोपडा) अशी मयत युगलांची नावे आहेत. प्रेम संबंधातून खून झाल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT