Beating Sakal
जळगाव

1 लाखासाठी पत्नीला मारहाण; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा

विवाहितेने माहेरहून १ लाख रुपये आणावे, यासाठी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विवाहितेने माहेरहून १ लाख रुपये आणावे, यासाठी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एमआयडीसी परिसरातील माहेर असलेल्या सिमा समाधान पाटील (वय ३०) यांचा विवाह गुजरात राज्यातील बारडोली येथील समाधान चिंधू पाटील यांच्याशी झाला. लग्नाच्या सुरवातीचे काही महिने चांगले गेले. त्यानंतर समाधान पाटील हा दारूच्या नशेत येऊन विवाहितेला शिवीगाळ करून लागला. आणि ‘माहेरहून १ लाख रुपये आणले नाही, तर मी तुला वागवणार नाही’ अशी धमकी दिली. सासू आणि नणंद यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. विवाहितेने एमआयडीसी पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती समाधान चिंधू पाटील, इंदूबाई चिंधू पाटील, साधना रघुनाथ पज्ञटील सर्व (रा. मरीमाता मंदीर, बारडोली, गुजरात) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विजय पाटील करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून महिला लेक्चररला अटक, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ!

Aakhri Sawal Review: गांधीजींची हत्या ते बाबरी पतन; कसा आहे संजय दत्तचा 'आखरी सवाल'? वाचा रिव्ह्यू!

US Fuel System: अमेरिकेतील पेट्रोल पंपांवरील इंधन प्रणाली हॅक! ATG सिस्टम ठरले धोकादायक; तपास यंत्रणांचा कुणावर संशय?

IPL चालू असतानाच हार्दिक पांड्या माहिकाची करणार लग्न? चर्चेला उधाण, पण नेमकं सत्य काय?

विरार-अलिबाग कॉरिडॉरला गती! शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळणार

SCROLL FOR NEXT