Gutkha truck seized by police. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : चोपड्यात ‘आयजी’ पथकाने 60 लाखांचा गुटखा पकडला

शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील अकुलखेडा गावाजवळ संशयित ट्रक पकडून साठ लाखाचा गुटखा जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : मध्य प्रदेशातून गुटखा भरून ट्रक चोपडा मार्गे येत असल्याची गोपनीय माहिती ‘आयजी’च्या पथकाला मिळाल्याने गुटखा भरलेल्या ट्रकचा पाठलाग करून अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील अकुलखेडा गावाजवळ संशयित ट्रक पकडून साठ लाखाचा गुटखा जप्त केला.

या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले. ()

नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना सोमवारी (ता. २९) सकाळी मध्य प्रदेशातून आयशर ट्रक (क्रमांक एमएच-१९, सीवाय ६९७२) यात गुटखा भरून सत्रासेंन, लासूर, हिंगोणा मार्गे चोपडा शहराकडे येत असल्याची गोपनीय माहिती रविवारी रात्री मिळाली होती.

या माहितीवरून आयजीच्या पथकाला गस्तीवर पाठवून बातमीची खातरजमा करीत असताना लासूर हिंगोणा गावाकडून एक ब्राऊन कलरचा ताडपत्री बांधलेला ट्रक येत असताना पथकाच्या कर्मचाऱ्यांना दिसताचा त्या ट्रकचा पाठलाग करून अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावरील शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील अकुलखेडा गावाजवळील चावरा इंटरनॅशनल स्कूलसमोर ट्रकच्या पुढे पथकाने खासगी स्विफ्ट डिझायर गाडी आडवी करून संशयित असलेला ट्रक थांबवून त्याची झाडाझडती घेतली असता त्यात गुटखा भरलेला आढळून आला.

या वेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर सावळे, सहाय्यक निरीक्षक अजित सावळे, पोलिस कर्मचारी विलेश सोनवणे, शेषराव तोरे, संतोष पारधी, संदीप भोई, रवींद्र पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर गुटखा भरलेला ट्रक शहर पोलिस ठाण्यात आणून त्यातील ४९ लाखांचा गुटखा, दहा लाख रुपये किमतीचा ट्रक आणि तीस हजार किमतीचे चार मोबाईल असा एकूण ५९ लाख ४६ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन चालक, क्लिनरसह एक जण असे तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

Madras High Court to Vijay Thalapathy : करूर चेंगराचेंगरी प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने विजय थलपतींना फटाकरलं!

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती

SCROLL FOR NEXT