Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime : चाळीसगाव शहरात अवैध धंद्यांना ऊत; पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुन्हेगार मोकाट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरासह पंचक्रोशीत सट्टा, जुगारासह देशी दारू, गांजा, भांग आदी अवैध धंदे जोरात सुरू असून, चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. (Illegal activities rise in Chalisgaon city jalgaon news)

शहरात बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानकाचा परिसर, घाट रोड, नागद रोड, डेअरी परिसर, पाटणादेवी रोड, तसेच काही पान स्टॉलवर खुलेआम देशी दारूविक्री केली जात असून, मटका खेळला जात आहे. याकडे मात्र पोलिसांचे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे.

येत्या शनिवारी (ता. २२) अक्षयतृतीया आहे. शहरासह आजूबाजूच्या परिसरात झन्ना-मन्ना जुगारातून लाखो रुपयांची उलाढाल होते. अक्षयतृतीयाच्या तीन, चार दिवस अगोदरच मोठ्या प्रमाणावर पत्त्यांचे क्लब सुरू होतात. काही क्लब पोलिसांच्या आशीर्वादाने तर काही क्लब चोरून लपून सुरू असतात. येथे ही झन्नामन्ना 'जुगार' खेळण्याची परंपरा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे.

पत्त्यांचे क्लबला पोलिसांची परवानगी घेण्यासाठी गेल्या दोन, तीन दिवसांपासून अनेक तरुण चकरा मारताना दिसत आहेत. येथे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव हे तीन तालुके मिळून उपविभागीय पोलिस कार्यालय आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

अधिकारी वर्ग आहे, शहरात दोन पोलिस ठाणे, मेहुणबारे येथे पोलिस ठाणे आहे. मात्र पोलिसांची कारवाई थंडावल्याने अवैध धंद्यांना उत आला आहे. येथे दोन वर्षांपूर्वी पोलिस निरीक्षक के. के. पाटील रुजू झाले होते, त्यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारी वर्गांवर सुरुवातीला वचक होता.

मात्र सहा महिन्यानंतर गुन्हेगारी वर्गाने काहीही न घाबरता शहरात दिवसा खून झाले. पुन्हा त्याला जशाच तसे उत्तर दिले गेले. त्याचप्रमाणे घरफोडी व शहरात व ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाणे वाढले असल्याची पोलिस ठाण्याला नोंद आहे. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये शहरात 'गुटखा' मोठ्या प्रमाणावर शहरात पकडला गेल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.

कारवाई नावालाच...

येथील पोलिस ठाण्याला संदीप पाटील नावाचे नवीन पोलिस निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती गेल्या दोन महिन्यांपूर्वी झाली. त्यांनी पत्रकारांना मुलाखतीत पोलिस ठाण्याच्या अंतर्गत अवैधधंद्यांचा नायनाट केला जाईल, असे सांगितले. मात्र शहरात सर्व आलबेल असल्याचे चित्र आहे.

येथील पोलिस ठाण्याला स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) पोलिस हे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदारांचा (रेशन दुकानदार) गहू, तांदूळ मोठ्या प्रमाणावर काळ्या बाजारात विकला जात असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. या मालासह वाहने पकडल्याच्या तशा नोंदी देखील पोलिस दप्तरी आहे. मात्र, यावर ठोस कारवाई होत नसल्याने स्थिती ‘जैसे थे’ होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT