Illegal adoption of a child esakal
जळगाव

बेकायदेशीररीत्या बाळ दत्तक घेतल्यास कायदेशीर कारवाई होणार

देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात जर कोणी बेकायदेशीररीत्या बाळ दत्तक घेत असतील किंवा दत्तक देत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिला आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ तसेच केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण मार्गदर्शक सूचनेनूसार १८ वर्षाखालील कोणतेही बाळ दत्तक घेणे व देणे आवश्यक आहे. काही व्यक्ती व संस्थाकडून समाजातील (विशिष्ट समाजाचा उल्लेख करून) ज्या व्यक्तींना लहान मुल दत्तक घ्यावयाचे असतील किंवा दत्तक म्हणून द्यायचे असतील त्यांनी संपर्क करावा, असा संदेश हॉटसॲपव्दारे तसेच समाजमाध्यमांवर संबंधितांच्या संपर्क क्रमांकासह प्रसारित केला जात आहे.

कोणीही असे बेकायदेशीर बाळ दत्तक घेवू अथवा देवू नये अन्यथा त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे प्रकार होत असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जळगाव (०२५७ -२२२८८२८), जिल्हा बाल संरक्षण कक्ष (०२५७-२२२८८२५, ८३०८१७७८११, ७२४९११८१६१, ९५०३७५४००७) तसेच चाइल्ड लाईन -१०९८ या हेल्पलाईनशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT