Bridge pillars exposed due to sand erosion.
Bridge pillars exposed due to sand erosion. esakal
जळगाव

Jalgaon : अवैध वाळूउपशाने बांभोरी पूल ‘Danger Zone’मध्ये

रईस शेख

जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध वाळूउपसाविरोधात मोहीम उघडली असून, ती स्वागतार्ह असली तरी दुसरीकडे गिरणा नदीपात्रात बांभोरी पुलानजीकच्या भागातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत आहे. यामुळे या पुलाच्या फाउंडेशनलाच धोका निर्माण झाला आहे.

हा अवैध वाळूउपसा पूर्णपणे थांबला नाही, तर गंभीर घटना जळगावातही घडू शकते व जळगाव जिल्ह्याचा पश्‍चिम खानदेशसह, नाशिक-मुंबई, गुजरातशी संपर्क तुटू शकतो. पुलाच्या भागातूनच बेसुमार वाळूउपसा झाल्याने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (Illegal sand transporting made Bambhori bridge Danger Zone Latest Jalgaon News)

तीन राज्यांचा कनेक्ट

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशाला जोडणारा दुवा म्हणून जळगाव शहरालगत बांभोरीजवळचा गिरणा नदीवरील पूल ओळखला जातो. मुंबई, नाशिक आणि गुजरातकडून राज्यात व विदर्भ, आंध्र प्रदेशाकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून (आधीचा महामार्ग क्रमांक ६) जाण्यासाठी बांभोरीचा एकमेव पूल आहे. नव्या महामार्गावर पाळधी ते तरसोददरम्यान बायपासचे चौपदरीकरण सध्या तरी थंड बस्त्यात आहे. परिणामी, याच पुलाचा वाहतुकीसाठी वापर होतोय.

अवजड वाहनांची वर्दळ

मुंबई, गुजरातकडून नागपूरकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने बांभोरी पुलावरून प्रचंड प्रमाणात अवजड आणि प्रवासी वाहनांची वर्दळ असते. खोटेनगरपासूनच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलावर मधोमध असलेले खड्डे वाचविण्याच्या नादात दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागल्याच्या घटना नित्याच्याच आहेत.

वाळूचा बेसुमार उपसा

नदीवरील कुठल्याही पुलाच्या शंभर मीटर परिघात वाळूचा उपसा करण्यास, खोदकाम किंवा ब्लास्टिंग करण्यास कायद्याने पूर्णतः बंदी आहे. असे असताना, गिरणा नदीवरील पूल मात्र याला अपवाद ठरतो. पावळ्यात गिरणा दुथडी भरून वाहिली. आता पाणी ओसरले असून, रात्रंदिवस गिरणा नदीत वाळूवाल्यांची अक्षरशः जत्रा भरते. रात्रंदिवस गिरणापात्रातून हजारो वाहनांद्वारे वाळू उपसली जाते. मग हा उपसा रेल्वे ब्रीज असो की महामार्गावरील पूल याजवळच मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. गिरणा पुलावर उभे राहिले, तरी खाली वाळूवाल्यांचे खड्डे स्पष्टपणे दिसतात.

जिल्‍हाधिकाऱ्यांची कारवाई

जिल्‍हाधिकारी अमन मित्तल दोन दिवसांपासून वाळूमाफियांच्या मागावर आहेत. अगदी रात्र असो की पहाट, मित्तलसाहेबांचा ताफा कधी कोणास पकडेल सांगता येत नाही. मात्र, त्यांच्या आधीही अनेक जिल्‍हाधिकारी होऊन गेले. त्यांनीही तशाच पद्धतीने वाळूमाफियांचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न केले. सुरवातीला कठोर कारवाई झाली. नंतर त्याच तिकिटावर तोच खेळ... नियोजनबद्धरीत्या राजकारण्यांकडून प्रकरण थंड बस्त्यात टाकण्यात येते. हा नेहमीचा अनुभव आहे.

सावधान! पुलावरील कंपने वाढली

ऑगस्ट २०१६ ला रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील सरस्वती नदीवरील पूल रात्रीतून वाहून गेल्याने दहा ते पंधरा वाहनांना जलसमाधी मिळाली होती. नुकताच गुजरात राज्यातील मोरबी येथील पर्यटकांसाठी असलेला पूल अचानक कोसळल्याने १४० लोकांचा मृत्यू ओढवला. त्याचप्रमाणे बांभोरी येथील गिरणा नदीवरील पुलाची अवस्था झाली असून, मालाने भरलेला साधा ट्रकही जात असला, तर पुलाची कंपने सहज दुचाकीस्वारास जाणवतात.

"महाड आणि गुजरात दुर्घटना घडल्यापासून प्रत्येक पुलाबाबत आता लोकांना भीती वाटायला लागली आहे. बांभोरी पुलावरून प्रवास करताना शेजारून एखादे अवजड वाहन गेल्यावर पुलावरील कंपने स्पष्ट जाणवतात." -ॲड. जाकिर अहमद, विधिज्ञ, जिल्हा न्यायालय

"हा पूल १९८६ मध्ये बांधला. साधारण ५० वर्षे त्याचे आयुष्य गृहीत धरले, तर तो २०३६ पर्यंत टिकायला हवा. दुर्दैवाने पुलाच्या आजूबाजूला गिरणा पात्रातून अवैध वाळूउपसा होत असल्याने त्याला धोका निर्माण झाला आहे. २०१४ मध्ये पुलाच्या फाउंडेशनला दोन कोटी रुपये खर्च करून दुरुस्त केले. त्यामुळे तो आणखी काही वर्षे तग धरेल; पण पुलासभोवताली २०० मीटरपर्यंत वाळूउपसा पूर्णपणे थांबला पाहिजे. किंबहुना नदीपात्रातील वाळूउपशावर कायमस्वरूपी निर्बंध हवेत." -प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: देशातील 'या' राज्यात होत आहे सर्वाधिक मतदान, वाचा दुपारी 1 पर्यंतची आकडेवारी

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT