Cheque News
Cheque News esakal
जळगाव

Jalgaon News : धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस कारावास व दंडाची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : शिरपूर येथील फटाका व्यापाऱ्याला धनादेश अनादर प्रकरणी न्यायालयाने तीन महिने साधा कारावास व चार लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

येथील फटाक्याचे व्यापारी गोविंद एकनाथ शिरोळे यांचे सावित्री एजन्सीजकडून शिरपूर (जि. धुळे) येथील व्यापारी विनोद राधेश्याम अग्रवाल यांनी २०१८ मध्ये २ लाख ९५ हजार किमतीचा फटाक्यांचा माल उधारीने विकत घेतला होता. (In case of dishonor of cheque Imprisonment and fine to accused Jalgaon News )

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

ही रक्कम परत करण्यासाठी व्यापारी विनोद अग्रवाल यांनी त्यांच्या खात्याचा धनादेश दिला होता. परंतु हा धनादेश न वटल्याने गोविंद शिरोळे यांनी पारोळा न्यायादंडाधिकारी (प्रथम श्रेणी) यांचे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता.

या खटल्यात गुणवत्तेवर सुनावणी होऊन दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पारोळा न्यायालयाचे न्यायमूर्ती के. के. माने यांनी आरोपीस दोषी ठरवून त्यास तीन महिने साधा कारावासाची व चार लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. फिर्यादीतर्फे ॲड. अकील युसूफ पिंजारी यांनी कामकाज पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT