In Ganpati Hospital check case Dr Sheetal Oswal sentenced to one year jalgaon crime news ESAKAL
जळगाव

Jalgaon Crime News : गणपती हॉस्पिटलमधील धनादेश प्रकरणात डॉ. शीतल ओसवाल यांना एका वर्षाची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील गणपती हॉस्पिटलचे संचालक डॉ. शीतल स्वरूपचंद ओसवाल यांना धनादेश अनादर प्रकरणी दाखल तीन खटल्यांमध्ये ५० लाखांचा दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. (In Ganpati Hospital check case Dr Sheetal Oswal sentenced to one year jalgaon crime news)

डॉ. ओसवाल यांनी अनिल तोताराम शिरसाळे व त्यांच्या पत्नी २००२ पासून गणपती हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशयन म्हणून सेवा देत होते. वर्षानुवर्षे दिलेल्या सेवेपोटी या दांपत्याला वेतनापोटी डॉ. ओसवाल यांनी ५५ लाखांचे धनादेश दिले होते. तसेच धनादेश दिल्याबाबत पत्रही दिले होते. त्यातील दहा लाखांचा एक धनादेश वटला होता.

तर अन्य दहा लाखांचे दोन व पाच लाखांचा एक धनादेश वटला नव्हता. त्यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेतली आणि धनादेश अनादरप्रकरणी पुरावे सादर केले. त्यानुसार प्रथम वर्ग न्या. जान्हवी केळकर यांच्यासमोर तीनही खटले चालले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यात डॉ. ओसवाल दोषी ठरल्याने तीनही खटल्यांत त्यांना दंडासह तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिरसाळे यांच्यावतीने ॲड. आर. आर. गिरणारे व ॲड. हेमंत गिरणारे यांनी काम पाहिले.

तीनही प्रकरणांत शिक्षा

१२ सप्टेंबर २०१९ ला दिलेल्या पाच लाख ७३ हजार ५४८ रुपयांच्या धनादेश अनादरप्रकरणी दहा लाखांचा दंड, एका वर्षाची शिक्षा, दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा ठोठावली आहे. तर १२ एप्रिल २०२० ला दिलेल्या दहा लाखांच्या धनादेश अनादरप्रकरणी २० लाखांचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

१० जानेवारी २०२१ ला दिलेल्या दहा लाखांच्या धनादेशप्रकरणी २० लाखांचा दंड व तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या शिक्षाही न्या. केळकर यांनी ठोठावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT