voting  esakal
जळगाव

Jalagon Political News : शेतकरी संस्थेच्या निवडणुकीसाठी अर्जांचा पाऊस ; राजकीय पक्षांमध्ये वातावरण तापले

येथील शेतकरी सहकारी संस्थेच्या २०२३ ते २०२८ या कालावधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, सहा मतदारसंघ व १५ निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalagon News : येथील शेतकरी सहकारी संस्थेच्या २०२३ ते २०२८ या कालावधीसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, सहा मतदारसंघ व १५ निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. (increased applications for election of Farmers Association heated up in political parties jalgaon political news)

दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी (ता. ८) अक्षरश: उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला असून. शेतकी संघाच्या निवडणुकीत एकूण १२१ अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. फुलपगारे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. सिंहले यांनी दिली आहे.

शेतकरी सहकारी संस्थेची व्यक्तिश: मतदार संख्या ७ हजार ३७७ तर संस्था १०८ अशी एकूण ७ हजार ४८५ मतदारांची संख्या आहे.

या निवडणुकीत व्यक्तिशः मतदार संघात ४, संस्था मतदार संघात ६, महिला राखीव मतदार संघात २, इतर मागासवर्गीय मतदार संघात १, अनुसूचित जाती जमाती मतदार संघात १, विमुक्त जाती भटक्या विमुक्त जाती व विमाप्र मतदारसंघात १ अशा १५ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

मतदार संघनिहाय दाखल अर्ज

व्यक्तीच्या मतदार संघ-५२, संस्था सभासद-२९, महिला मतदार संघ-१६, इतर मागासवर्गीय मतदार संघ-१४, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ-५,

विजाभज व विजाप्र मतदार संघ ५ असे एकूण १२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, अर्ज छाननी व माघारीच्या दिवशी किती अर्ज शिल्लक राहतात. तसेच प्रत्येक राजकीय गटाकडून उमेदवारांची मनधरणी कशी केली जाते, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT