Students presenting a cultural program at the Republic Day main event at the police drill ground.
Students presenting a cultural program at the Republic Day main event at the police drill ground. esakal
जळगाव

Republic Day 2024 : विजयी विश्व तिरंगा प्यारा..झेंडा उंचा रहे हमारा..

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : है जहा की प्रीत यहा भारत का रहेनावाला हूं, भारत की बात सूनाता हू, विजयी विश्व तिरंगी प्यारा, झेंडा उंचा रहे हमारा.., वंदे मातरम, भारत माता की जय..च्या जयघोषात काल (ता.२६) भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

सर्वत्र देशभक्तिमय वातावरण पहावयास मिळाले. सर्वच शाळा, महाविद्यालय, खासगी संस्था, शासकीय कार्यालयात ध्वजवंदनाचे कार्यक्रम, मोटार सायकल रॅली, देशभक्तिपर गीत गायन स्पर्धा आदी कार्यक्रम झाले. (Indias 75th Republic Day was celebrated with great enthusiasm in jalgaon news)

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदानावर ध्वजवंदन झाले. राष्ट्रगीत, राज्यगीत व राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. ज‍िल्ह्यातील व‍िव‍िध शाळांमधील व‍िद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

विविध कला आविष्कार व सांस्कृत‍िक कार्यक्रमांनी रंगत आणली. ज‍िल्ह्यातील व‍िविध शाळांमधील बालचमूंनी सादर केलेले मल्लखांब, लाठी-काठी , लेझीम नृत्य, साहसी मानवी मनोरे, योगासने, कराटे प्रात्यक्ष‍िक व देशभक्तिपर गीत सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडाकडाटाट दाद द‍िली.

तरूणाईची चपळता...

वरणगाव येथील महात्मा गांधी व‍िद्यालयाच्या व‍िद्यार्थ्यांचे मल्लखांब कौशल्य दाखविताना कुमारवयीन ‍व‍िद्यार्थ्यांची चपळता व शारीर‍िक कसरत पाहून उपस्थ‍ित अवाक झाले. सावखेडे येथील ब.गो.शानबाग विद्यालयाच्या व‍िद्यार्थी-विद्यार्थिनींनी तालबद्ध लाठी-काठी व लेझीम नृत्याचे दर्शन घडविले.

डॉ.अन‍िता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या मुलांच्या संघाने जिम्नॅस्टिकमधील योगासन कौशल्य दाखव‍िले. पोलिस पथकांतील बालचमूंनी कराटेचे मनोवेधक सादरीकरण केले.एकाहून-एक सरस प्रात्यक्ष‍िक, कला-कौशल्य दाखविताना तरुणाईची चपळता पहायला म‍िळाली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. तंबाखूमुक्तीची शपथ व कुष्ठरोग निवारणानिमित्त प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात आली.

रुग्णालय व महाविद्यालयात डॉक्टर्स, परिचारिका यांनी सलोख्याने राहावे. रुग्णसेवेला कायम प्राधान्य द्यावे. अधिकाधिक दर्जेदार सुविधा देण्यास आपण तत्पर आहोत, असे म्हणाले. उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे.

मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड, विभागप्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर्स, परिचारिका, अधिकारी, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे, परिचर्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले.

चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघ

येथील चैतन्य नगर ज्येष्ठ नागरिक संघात प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन अध्यक्ष ॲड अरुण धांडे यांनी केले. ७५ व्या प्रजासत्ताक दिनाचे, मूलभूत अधिकार, संबंधी माहिती दिली. फेस्कॉमचे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी, सुभाष सोनावणे, श्री. मोते, माजी अध्यक्ष पंडितराव सोनार, आय. एच. पाटील, प्रतिभा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

चैतन्य नगर जेष्ठ नागरिक संघात ध्वजवंदन करताना अध्यक्ष अरूण धांडे आदी.

संगीत साधना मंच साधक अविनाश राव, मंजूषा राव, अंजली चौधरी, उषा सोनावणे, श्री.मोते, पुष्पा पाटील यांनी देशभक्तिपर व भावगीते सादर केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष साहेबराव पाटील यांनी केले.

इकरा महाविद्यालय

येथील इकरा थीम महाविद्यालयात ध्वज वंदन कार्यक्रमास इकरा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष इकबाल शाह अध्यक्षस्थानी होते. संचालक डॉ.जबिअल्ला शाह, आयटीआयचे प्राचार्य जुबेर मलिक, प्राचार्य डॉ.चांदखान, उपप्राचार्य डॉ .वकार शेख, डॉ .तनवीर खान, प्रा.इब्राहीम पिंजारी, प्रा.डॉ.युसूफ पटेल, प्रा.साहेल अमीर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून भाषणे केली. अलबिया शेख यांनी सूत्रसंचालन केले. नशरा असलम खान हिने आभार मानले.

म्हसावद प्राथमिक शाळा

म्हसावद (ता.जळगाव) येथील ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक व माध्यमिक शाळेत माजी शिक्षणाधिकारी अरूण पाटील यांनी ध्वजवंदन केले.

संस्थेचे अध्यक्ष पंकज साळूंखे, संचालिका दीपाली पाटील, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सखीना बी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, नाटके, भाषण सादर करून देशभक्तीचा संदेश दिला. एन.डी.चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. आर.जी.राठोड यांनी आभार मानले.

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीअम स्कूल

येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीअम स्कूल, प्रगती विद्या मंदिर, प्रगती माध्यमिक शाळेत मंगला दुनाखे यांनी ध्वजवंदन केले. चेअरमन प्रेमचंद ओसवाल, संस्थाध्यक्षा मंगला दूनाखे, सचिव सचिन दूनाखे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत, कवायत सादर केल्या. बालवाडीतील वेदश्री ठाकरे हिने देशभक्तिपर गीत सादर केले.दीपाली वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. अलका करणकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT