Gram crop burning in Rajendra Pawar's field due to blight and worm infestation. esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : दुबार पेरणीच्या हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव; बोगस बियाण्यामुळे पहिली पिके वाया

उमेश काटे

Jalgaon Agriculture News : अगोदरच शेतकरी कर्जाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. त्यातच रब्बीचे पीक चांगले येईल, या भाबड्या आशेवर हरभऱ्याची पहिली पेरणी केली. मात्र तेथेही काही शेतकऱ्यांचा घात झाला.

बोगस बियाण्याने पहिली पेरणी वाया गेली. दुसरी पेरणी कशीबशी पूर्ण केली. मात्र त्यानंतरही हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. (Infection of gram crop due to mar disease jalgaon agriculture news)

अळीचेही आक्रमण झाल्यामुळे उत्पन्नात ५० टक्के घट निर्माण होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे हातचे पीकही वाया जाईल काय? असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

तालुक्यात यंदा रब्बी क्षेत्र वाढले आहे. त्यात खेडी सिम प्र.ज., खेडी खुर्द प्र.ज., अमळगाव, खवशी, पिंपळी, मेहरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा हरभऱ्याकडे कल वाढला आहे. अमळगाव मंडळ व पातोंडा मंडळ परिसरात पेरलेले बी पूर्ण उगवले, पण मर रोगामुळे हिरवीगार झाडे उभी वाळत आहेत.

काही दिवसांपूर्वी झालेल्या बेमोसमी पावसामुळे जमिनीतील ओलाव्यामुळे व ढगाळ वातावरणाने जमिनीत बुरशी तयार होऊन, हरभऱ्यावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यास महागडी औषधे फवारून उपयोग होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. परिणामी, शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. खरिपातही निसर्गाने मोठे नुकसान केले. आता रब्बीतही असेच होते की काय? अशी शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

पहिल्या पेरणीवर गंडांतर

खेडी सिम प्र. ज. (ता. अमळनेर) येथील राजेंद्र साहेबराव पवार, प्र. भा. श्याम पवार व नाना त्र्यंबक पाटील या शेतकऱ्यांनी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात हरभऱ्याची पेरणी केली होती. मात्र हरभऱ्याचे बियाणे बोगस निघाल्यामुळे शेतात काहीच उगवले नाही. त्यानंतर मात्र शेतकरी हवालदिल झाला. त्यानंतर पंधरा ते अठरा दिवसानंतर दुबार पेरणी करण्याचे संकट या शेतकऱ्यांवर कोसळले. बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीने पंचनामा केला आहे. मात्र सद्यस्थितीत संबंधित कंपनीला संपर्क केला असता संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीचे उत्तर दिले जातात. ज्याच्याकडून बियाणे खरेदी केली आहेत, ते कृषी केंद्रचालक तर शेतकऱ्यांचा फोनही उचलत नाही. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली असता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कृषी विभागाने पंचनामाही केला आहे.

''यंदा रब्बी पीक चांगले येईल, या आशेवर १२ ऑक्टोबरला हरभऱ्याची पेरणी केली. मात्र बोगस बियाणामुळे शेतात काहीच उगवले नाही. संबंधित कंपनीकडे दाद मागितली, ते पंचनामा करून गेले आहेत. कृषी विभागानेही पंचनामा केला आहे.

उसनवारीचे पैसे घेऊन दुबार पेरणी केली, मात्र दुष्काळात तेरावा महिना यानुसार हरभऱ्यावर आता मर रोग तसेच अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बोगस बियाण्याबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार करणार आहे.''- राजेंद्र पवार शेतकरी, खेडी सिम प्र.ज. (ता अमळनेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT