(Infertility campaign in December for cow buffaloes in jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : गाय -म्हशींसाठी डिसेंबरमध्ये ‘वंध्यत्व निवारण अभियान’

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दूध उत्पादनासाठी गायी- म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणे व भाकड जनावरांचे वंधत्व निवारण करून माजावर आणण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये १ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये ‘राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान’ राबविण्यात येत आहे. (Infertility campaign in December for cow buffaloes in jalgaon news)

या अभियानाच्या माध्यमातून शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. शिबिरांमध्ये गायी-म्हशींची तपासणी करून वंध्यत्वाचे निदान करून उपचार करण्यात येणार आहे. जनावरांचे अपेक्षित शारीरिक वजन वाढ व पशू प्रजनाचा थेट संबंध असल्याने शारीरिक वजन घट असलेल्या जनावरांमध्ये वंध्यत्वाची शक्यता दाट असते.

अशा जनावरांची तपासणी करून योग्य पशुआहार देण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये सर्व गायी-म्हशींची तज्ज्ञ टीमद्वारे तपासणी करण्यात येऊन योग्य ते उपचार करण्यात येणार आहेत. सर्व पशुपालकांनी या वंधत्व निवारण अभियानाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT