Commissioner Dr. while inspecting the road work. Vidya Gaikwad Neighbor City Engineer Chandrakant Songire, Health Officer Uday Patil etc. esakal
जळगाव

Jalgaon News : आयुक्तांकडून रस्ते, बायोमायनिंग कामाची पाहणी; थेट डांबरीकरणाच्या लेअरची तपासणी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी शहरातील रस्ते कामाची व कचरा बायोमायनिगंच्या कामाची पाहणी करीत आवश्‍यक त्या सूचना केल्या.

पावसाळ्यानंतर शहरातील अनेक भागात रस्ते डांबरीकरणाच्या कामांना सुरुवात झालेली असून निमखेडी रस्त्यावरील देवरामनगर मधील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम केले जात आहे. डॉ. विद्या गायकवाड यांनी बुधवारी (ता.१८) अचानक कामे सुरू असताना भेट दिली. (Inspection of roads biomining work by commissioner jalgaon news)

यानंतर सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामांच्या लेअरची जाडी तपासून पाहणी करत आवश्‍यक त्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, शाखा अभियंता योगेश वाणी, सहाय्यक आयुक्त उदय पाटील उपस्थित होते.

या भागात अनेक वर्षानंतर प्रथम रस्त्याचे डांबरीकरण होत असल्याने यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच काही नागरिकांनी आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे कामाबाबत काही तक्रारीही केल्या. त्यानंतर कामाची गुणवत्ता योग्य राखण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

कचरा बायोमायनिंगची पाहणी

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे' आव्हाने शिवार गट नंबर ८६४ येथे सुरू असलेल्या बायोमायनिंगच्या कामाची देखील आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी पाहणी केली. बायोमायनिंगच्या कामाची गती वाढवणे, प्रस्तावित बांधकामासाठी आवश्यक जागेवरील कचऱ्याचे बायोमायनिंगला प्राधान्य देणे, दैनंदिन येणारा कचरा डम्प करण्यासाठी सुव्यवस्था करणे, कचऱ्याला आग लागून धूर निघणार नाही म्हणून आवश्यक द्रव्य फवारणी करणे, याबाबत संबंधित मक्तेदारास व अधिकारी यांना समक्ष सूचना देण्यात आल्या व त्यानुसार कार्यवाही बाबतची पुन्हा पाहणी करण्यात येईल असे यावेळी निर्देश त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT