Gulabrao Patil esakal
जळगाव

Jalgaon : रस्त्यासाठी पालकमंत्र्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिरसोली (ता. जळगाव) प्र. बो. येथील जुना धानवड शेतरस्त्याची दुरवस्था झाली होती. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे लोकसहभागातून रस्ता करण्याचा मानस बोलून दाखविला.

मंत्री पाटील यांनी तत्काळ रस्त्यासाठी आर्थिक मदत करून शेतकऱ्यांच्या लोकसहभागातून केवळ आठ-दहा दिवसांत दोन किलोमीटर रस्त्याचे मुरमीकरण पूर्ण करण्यात आले.

शिरसोली येथे पालकमंत्री पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानून ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सेनेचे पदाधिकारी यांनी सत्कार केला.(Involvement of Gulabrao Patil for the road jalgaon news)

या वेळी मंत्री पाटील यांनी या रस्त्यावर स्थानिक आमदार निधीतून मोरी बांधकाम करण्यात येईल, निधीची कमतरता भासू देणार नाही, शिरसोली ते जुना धानवड रस्त्याचे पुढील काळात खडीकरण व डांबरीकरण करू, असे आश्वासन दिले.

सरपंच प्रवीण बारी, माजी सभापती नंदलाल पाटील, उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ सोनवणे, सोसायटीचे अध्यक्ष विजय काटोले, माजी सरपंच प्रदीप पाटील, शिवदास बारी, नंदू वराडे, माजी सरपंच हिरामण काटोले, घनश्याम काटोले, भागवत बारी, अनिल पाटील, पंडित मामा, श्रावण ठाकूर व शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT