जळगाव

जळगाव जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांना चालना मिळणार

देविदास वाणी

जळगाव ः तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांना चालना देण्यात येईल. महामंडळामार्फत सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रलंबित सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. असे आदेश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले. 

जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांची आढावा बैठक येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी ते बोलत होते. आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, मनीष जैन, राजेश देशमुख, दिलीप वाघ, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बी. एस. स्वामी, मुख्य अभियंता एम. एस. आमले, अधिक्षक अभियंता पी. आर. मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब घोरपडे, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील आदी उपस्थित होते. 

मंत्री पाटील म्हणाले की, पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पात येत्या तीन वर्षात पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक कामाचे नियोजन करावे. यासाठी दरवर्षी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करावे. या धरणाच्या डिझाईनचे काम एक महिन्याच्या आत पूर्ण करा. जिल्ह्यातील प्रकल्पांना या आर्थिक वर्षात जी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे. त्यापैकी काही निधी मिळणे बाकी आहे. सदरचा निधी लवकरात लवकर मिळाल्यास कामे पूर्ण करता येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली, त्यासाठी तातडीने वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन यावर तोडगा काढण्याची सुचनाही त्यांना मंत्री पाटील यांनी केली. 

वरखेड लोंढे धरण वाळूक्षेत्र घोषीत… 
वरखेड लोंढे धरण क्षेत्रास वाळूक्षेत्र घोषित करुन याठिकाणी होणाऱ्या वाळू साठयाच्या विक्रीतून मिळणारा निधी हा जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यास वापरण्याबाबत तपासणी करण्याची सुचनाही मंत्री पाटील यांनी यावेळी केली. 

अन्य प्रकल्पाची देखील घेतली माहिती

बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील वाघूर प्रकल्प, शेळगाव बॅरेज, वरखेड-लोंढे, सुलवाडे-जामफळ, महाकाय पुनर्भरण योजना, गिरणा नदीवरील ७ बंधारे, नर्मदा-तापी वळण योजना, नार-पार गिरणा वळण योजना, बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, वरणगाव- तळवेल उपसा सिंचना योजना, निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ब्रिटीशकालीन फड बंधारे, भागपूर उपसा सिंचन योजना आदी प्रकल्पांवर चर्चा केली. 

 आमदारांनी केली मागणी

आमदार अनिल पाटील यांनी पाडळसे धरणासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतुद करावी, पांझरा ते मांदळ नदी जोडप्रकल्पाला मान्यता मिळण्याची मागणी केली. आमदार किशोर पाटील यांनी भडगाव शहर पाणीपुरवठा योजनेस पाटबंधारे विभागाची ना हरकत मिळण्यासह गिरणा नदीवरील ७ बंधाऱ्याचे काम लवकर होण्याची मागणी केली. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT