Vehicles parked on road in front of Axis Bank near Govinda Rickshaw Stop, in second photo Vehicles parked in front of COMLEX near District Court
Vehicles parked on road in front of Axis Bank near Govinda Rickshaw Stop, in second photo Vehicles parked in front of COMLEX near District Court esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : वाहनांनी दोन्ही बाजुनी रस्ता खाल्ला; महापालिका प्रशासनाने घेतले झोपेचे सोंग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावर चालणे मुश्कील झाले असताना महापालिकेचे केवळ प्रयोगाचे खेळ सुरु आहे. रोज नव्या रस्त्यांवर नवनवीन बांधकामे रस्ता गिळंकृत करू लागली आहे. महापालिका व शहर वाहतूक शाखेकडून संयुक्त कारवाई होत नसल्याने रहदारीचा विषय बिकट होत आहे.

जळगावला नगररचना विभागाचे कायदे, वाहतूक नियम असोत की, रहदारीच्या रस्त्यावरील वाढते अतिक्रमण महापालिका, वाहतूक शाखेने डोळ्याला पट्टी बांधून झोपेचे सोंग घेतल्याची परिस्थिती आहे. (issue of traffic is getting worse as there is no joint action by Municipal Corporation and City Transport Department jalgaon news)

नेहरू पुतळा ते फुले मार्केट गांधी मार्केटपर्यंत महापालिकेने रहदारीला अडथळा होऊ नये यासाठी विटा गाडून पिवळ्या पट्ट्या बाहेर वाहने उभी असल्यास ती वाहने ताब्यात घेण्याची योजना आखली.

नव्याचे नऊ दिवस म्हणत पट्ट्या बाहेरील काही दुचाकी वाहने मनपा अतिक्रमण विभागाने जमाही केली मात्र, नंतर परत जैसे थे अवस्था आहे. नेहरु चौक ते भिलपुरा या रस्त्यावर जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागते. राजकारणातील मातब्बर मंडळींची ही बांधकामे असल्याने त्यांना पार्किंगचा नियमच लागू होत नाही अशा आविर्भावात त्यांची दादागिरी सुरु आहे.

कागदावरची नगररचना

व्यापारी संकुल, दुकान, शोरुमच्या नकाशाला मंजुरीत तळघर पार्किंग म्हणून वापरात असणे अपेक्षीत आहे. तसा, कायदाही असून बांधकामाचे नकाशे कागदावर तसेच मंजूरही केले जातात मात्र, प्रत्यक्ष पार्किंगची सोयच या इमारतींना नसते.

कारण नगररचना विभागाच्या कुठल्याच अभियंत्याकडून साईट व्हिजिट केली जात नाही. बांधकाम आराखड्यात पार्किंग दाखवून प्रत्यक्ष बांधकामात मात्र गायब करण्याचे हे दृष्टचक्र बिल्डर्स,राजकारण्याकडून सुरु असल्याने सामान्यांना बांधकाम मंजुरीसाठी नियम दाखवून उंबरठे झिजवायला लावणाऱ्या या विभागाकडून सर्रास उल्लंघन दिसते.

हे गिळलं..आता या रस्त्यांचा नंबर

मुख्य बाजारपेठेच्या भिलपुरा चौक ते नेहरु चौक या रस्त्यावर कुठल्याच व्यापारी प्रतिष्ठानसाठी पार्किंगची स्वतंत्र सोय नाही. महापालिकेच्या मार्केटच्या पार्किंग हॉकर्सने गिळल्या आहेत.

नेहरु चौक ते गोविंदा रिक्षा स्टॉप आणि पुढे पिंप्राळा रोड, चित्रा चौक ते न्यायालय चौक,रिंगरोड वरील नवी संकुले, शिवाजी पुतळा ते गणेश कॉलनीपर्यंत उभारल्या जाणाऱ्या इमारतींना पार्किंगची सोय असल्याची आढळत नाही.

येथे अडचणींचा सामना

गोविंदा रिक्षा स्टॉप पटेल प्लाझा, नव्याने उभारलेले ट्रेन्डस्‌ शोरुम समोर पार्कींगची जागा आहे मात्र, तिथवर वाहने येवुनये याचीच सोय केल्याने ग्राहकांची वाहने रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करत उभी राहतात.

न्यायालय चौकातील जे.टि.चेंबर, ओम चेंबर, जुनी शिवा हॉटेल जवळ, शाहुनगर बंधन बँक, ख्वॉजामिया समोरील दुकाने, युनिटी चेंबर समोरील रांग. शिवाजीनगर उड्डाण पुलाशेजारील सर्विस रोड, टॉवर चौक ते चित्रा चौक दरम्यानची व्यापारी प्रतिष्ठाने, चित्रा चौक ते अजिंठा चौका पर्यंतचा रस्ता, महाबळ ते थेट रेल्वेस्थानक पर्यंतचा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.

शहर वाहतूक की मनपा

पूर्वी शहर वाहतुक शाखेचे एक अधिकारी चार कर्मचारी अतिक्रमित वाहनांवरील कारवाईसाठी तत्पर दिसायचे पण राजकीय हस्तक्षेप वाढल्याने दोन्ही विभागांनी कारवाया बंद केल्या.

वाहतूक शाखेकडून कारवाई होत नाही. रस्त्यावरील अडथळे मोकळे करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका यंत्रणेला हप्तेखोरीत उसंत मिळत नाही. अशा तक्रारी आहेत.

वॉर्डन ब्बाईज्‌ वर होती मदार

शहर वाहतुक शाखेत २५ वॉर्डन बॉईज अतिक्रमित वाहनांवर कारवाया करत. मात्र, पोलिसांसाठी लाच स्वीकारली म्हणून एका वॉर्डनला अटक झाली.

काही तरुणांना पोलिस कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी नेमल्याच्या तक्रारीमुळे मागेच वॉर्डन बॉईज द्वारे वाहतूक नियंत्रणाची पर्यायी व्यवस्था बंद झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT