Bharat Amalkar speaking at the workshop 'Advance e-Technology for Societal Applications' held at Umvi  esakal
जळगाव

Jalgaon NMU Workshop : शेतीत ॲग्री रोबोट, ड्रोनचा वापर अत्यावश्‍यक; तज्ज्ञांचा सूर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon NMU Workshop : मुख्य पिकांच्या उत्पादनातील स्थिरता, महागडी बी-बियाणे व खते, हवामानातील बदल आणि जमिनीचा खालावलेला पोत ही भारतीय कृषी क्षेत्रातील मोठी आव्हाने असून, ती पेलण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये ॲग्री रोबोट आणि ड्रोनचा वापर होणे गरजेचे आहे,

असा सूर ‘उमवि’त आयोजित कार्यशाळेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. अरविंद शाळीग्राम व अन्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उमटला. (It is necessary to use agri robots and drones in modern agriculture jalgaon news)

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भौतिकशास्त्र प्रशाळेमधील इलेक्ट्रॉनिक्स विभाग आणि अभ्यास मंडळ (इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन) व अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षातर्फे ‘ॲडव्हान्स इ-टेक्नॅालॉजी फॉर सोशियटल ॲप्लीकेशनस’ या विषयावरील कार्यशाळा झाली.

उच्च व तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक आणि केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्‌घाटन झाले. इस्त्रोचे संचालक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पेस टेक्नॉलॉजी सेंटरचे प्रा. शाळीग्राम यांनी ॲडव्हान्सेस इन ॲग्री रोबोटिक्स या विषयावर बीजभाषण केले.

रोबोटिक्सचे तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी संगणक व इलेक्ट्रॉनिक्सचे ज्ञान आवश्‍यक आहे. तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे असून, जी शेती करताना ॲग्री रोबोट आणि ड्रोनचा वापर महत्त्वपूर्ण आहे.

पिकांच्या खुरपणी कामी वेडींग रोबोट उपयुक्त ठरतील. विशिष्ट ऋतूमध्ये येणार फळे वर्षभर उपलब्ध होण्यासाठी त्यांना डिहायड्रेशन करून निर्यात करण्यासाठी ॲग्री रोबोट महत्त्वाची भूमिका करू शकतात, असे ते म्हणाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

देश विकासात योगदान देणारे संशोधन करा : अमळकर

भरत अमळकर यांनी तरुण संशोधकांनी चाकोरीच्या पलीकडे जात देशाच्या विकासात योगदान देणारे संशोधन करावे. उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणारी पिके आणि त्यांच्या समस्यांवर संशोधन करावे, असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात प्रशाळेचे संचालक प्रा. ए. एम. महाजन यांनी कल्पनांचे आदान प्रदान व्हावे व तरुण संशोधकांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी राष्ट्रीय स्तरावर या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.

डॉ. ए. एल. चौधरी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय घोष यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे व डॉ. आर. जी. बावने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. डी. जे. शिराळे यांनी आभार मानले.

द्वितीय सत्रात मार्गदर्शन

द्वितीय सत्रात सुरत येथील वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठाचे डॉ. के. सी. पोरिया, राजस्थान येथील पिलानी विद्यापीठाचे डॉ. शशिकांत सदीस्ताप, नागपूर विद्यापीठाचे डॉ. सतीश शर्मा यांनी परिसंवादात मार्गदर्शन केले.

या वेळी संशोधक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स व मॉडेलच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पाहुण्यांच्या हस्ते झाले. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. कार्यशाळा यशस्वितेसाठी डॉ. जी. डी. देशमुख, डॉ. के. डी. गायकवाड, डॉ. ललित पाटील, डॉ. एल. बी. पटवे आदींनी परिश्रम घेतले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT