Jalgaon Municipal Corporation  esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : महापालिकेला अभय योजनेत 110 कोटीची वसुली

Jalgaon Municipality : महानगरपालिकेने थकबाकीसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality : महानगरपालिकेने थकबाकीसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. योजनेअंतर्गत ३० हजार ४३६ मालमत्ताधारकांना १२ कोटी ३५ लाख रुपयांची शास्ती माफ झाली आहे. तर ११० कोटीची विक्रमी वसुली झाली. महापालिकेने यावर्षी घरपट्टी थकबाकीदाराकडील वसुली वाढविण्यासाठी अभय शास्ती योजना राबविली यात ७५ हजार १६० मालमत्ताधाकांनी मालमत्तांचा कर भरला आहे. (Jalgaon 110 crores recovered from Municipal Corporation in Abhay Yojana)

त्यात १५ हजार ४०५ मालमत्ताधारकांनी २० कोटी ७५ लक्ष रुपये ऑनलाईन कर भरला. २०२१-२२ आर्थिक वर्षांत महानगरपालिकेची ५६ कोटी रुपये वसुली झाली असून २०२२-२३ मध्ये १०६ कोटी रुपयांची वसुली झाली होती. तर यावर्षी ११० कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

अभय शास्ती योजनेमुळे वर्षभरात २०४ कोटींपैकी ११० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. या वर्षींच्या ८५ कोटी ७२ लाखांपैकी ७५ टक्के वसुली झाली आहे. मागील थकबाकी ११८ कोटी ३८ लाख पैकी ४६ कोटींची वसुली झाली आहे. (latest marathi news)

मात्र, अजूनही शहरातील १ लाख ३२ हजार मालमत्ताधारकांपैकी ५६ हजार ८४० मालमत्ताधारकांकडे अद्यापही थकबाकी आहे. महापालिकेतर्फे आता थकबाकी वसुलीसाठी कडक भूमिका घेण्यात येणार असून शास्ती व व्याजासह जप्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे.

"महापालिकेतर्फे घरपट्टी थकबाकीदारांसाठी दंड व्याज माफीची योजना बंद करण्यात आली आहे. थकबाकीदारांना आता दंड आणि व्याज आकारले जाईल. तसेच त्यांचे नळ कनेक्शन बंद करून त्यांच्या मिळकतीवर जप्तीही आणण्यात येईल."- गणेश चाटे (उपायुक्त महापालिका )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

MPSC Student : आर्थिक कोंडीमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी धरली गावाची वाट; अभ्यासिका पडल्या ओस?

Pattankodoli Birdev Yatra Farande Baba Bhakanuk : राज्यासह केंद्रात राजकीय उलथापालथ होईल, देशात आंदोलने होतील; पट्टणकोडोली फरांडे बाबांची भाकणूक उत्साहात संपन्न

Diwali Water Supply Update in Pune : दिवाळीत पुणेकरांना मोठा दिलासा; ५ नोव्हेंबर रोजीची गुरुवारची पाणी कपात रद्द, सुरळीत पाणीपुरवठा होणार

SCROLL FOR NEXT