Fruit sellers sitting on the street in front of Phule Market. Artisans repairing cars on the road leading from Neri Naka to Ajantha Chowk. esakal
जळगाव

Jalgaon News : बारा-15 मीटर रुंद रस्ते अतिक्रमणाने झाले 6 मीटर! वाहने कशी चालविणार?

Jalgaon : शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांच्या नूतनीकरणाची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होतेय व त्यापैकी बहुतांश रस्त्यांचे काम पूर्णत्वाकडे आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांच्या नूतनीकरणाची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होतेय व त्यापैकी बहुतांश रस्त्यांचे काम पूर्णत्वाकडे आहे. मात्र, नव्याने तयार केलेल्या या रस्त्यांना अतिक्रमणाने विळखा घातलांय. कागदावर १२-१५ किंवा १८ मीटर रुंद रस्ते अतिक्रमणामुळे प्रत्यक्ष जागेवर अवघे ६-८ मीटरच भरत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे तर दूरच अगदी चालणेही कठीण झालेय. (15 meter wide roads become 6 meters due to encroachment )

रस्त्यांवरील वाढत्या अतिक्रमणासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित करून तात्पुरत्या सतर्क होणाऱ्या महापालिकेने या विषयावरून डोळ्यांवर पट्टी बांधलीय की काय, असा प्रश्‍न पडतो. एवढी गंभीर स्थिती शहरात आहे.

रस्ते तयार होतांय, पण

जळगाव शहरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांमधील खड्ड्यांमधून जीवघेणा प्रवास करीत होते. अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटारांच्या कामांनी तर रस्ते नावाचा प्रकारच शहरात राहिला नव्हता. ही योजना कशीबशी पूर्ण झाली आणि रस्त्यांसह जळगावकरांनी सुटकेचा श्‍वास सोडला. वेगवेगळ्या माध्यमातून मोठा निधी मंजूर होऊन शहरातील रस्त्यांची कामेही मार्गी लागली. काही प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण, तर मध्यवर्ती भागातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण सुरू आहे.

वर्दळीच्या रस्त्यांना विळखा

जळगाव शहरातील सर्वांत वर्दळीचे रस्ते म्हणून अगदी बोटावर मोजण्याइतकेच रस्ते आहेत. त्यात चित्रा चौक ते कोर्ट चौक व कोर्ट चौक ते गणेश कॉलनी हा जवळपास अडीच किलोमीटरचा रस्ता, चित्रा चौक ते स्मशानभूमी व पुढे अजिंठा चौकापर्यंत, पुष्पलता बेंडाळे चौक ते पांडे डेअरी चौक व पुढे सिंधी कॉलनी- इच्छा देवी चौकापर्यंत, टॉवर चौक ते भिलपुरा चौकीपर्यंत, टॉवर चौक ते चित्रा चौक, टॉवर चौक ते नेहरु चौक, स्वातंत्र्य चौकापर्यंत असे साधारणपणे आठ- दहा रस्ते प्रमुख असून, त्यावर दिवसभर प्रचंड वर्दळ, वाहतुकीची कोंडी असते. या रस्त्यांची कामे गेल्या काही वर्षांत पूर्ण झाली. रस्त्यांची कामे करताना त्यांचे रुंदीकरणही करण्यात आले. मात्र, या सर्व रस्त्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. (latest marathi news)

रस्ते वाहनधारकांसाठी, की अतिक्रमणधारकांसाठी?

शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी चित्रा चौक ते कोर्ट चौक व पुढे गणेश कॉलनीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रस्ता रुंदही झाला. मात्र, या रस्त्याच्या दुतर्फा फळ-भाजीपाला व अन्य पदार्थ विक्रेत्यांनी अक्षरश: रस्त्याच्या मध्यभागापर्यंत अतिक्रमण केले आहे. गोलाणी व्यापारी संकुलाजवळ, दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरात, रिंग रोडपासून थेट गणेश कॉलनीपर्यंत रस्त्यावरील अतिक्रमणाने हा एका बाजूने (दुभाजकाच्या) १२-१५ मीटर असलेला रस्ता अगदी ६ मीटरपर्यंत अरुंद बनला आहे.

त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. अजिंठा चौक ते नेरी नाका व पुढे थेट टॉवरपर्यंतच्या रस्त्यावरही दोन्ही बाजूंनी अतिक्रमण वाढलेय. स्मशानभूमी ते अजिंठा चौकापर्यंत मोठा कॉंक्रिटचा मार्ग झालांय. मात्र, त्यावर दुतर्फा भंगार, ट्रकचालकांचे अतिक्रमण आहे.

मुख्य बाजारात कोंडी

टॉवर चौक ते भिलपुरा चौकीपर्यंतचा रस्ता मुख्य बाजारपेठेतील प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावर केवळ शहरातील नव्हे; तर जिल्हाभरातून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची मोठी गर्दी असते. मात्र, या रस्त्याच्या दुतर्फा हॉकर्सने मनमानी करून थेट रस्त्यावरच ठेले, हातगाड्या लावल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन चालणे कठीण झाले आहे.

महाबळचा राजमार्गही अरुंद

आकाशवाणी चौकापासून काव्यरत्नावली चौकापर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाले. हा रस्ता बऱ्यापैकी रुंद आहे. मात्र, या रस्त्यावरही आता दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाले आहे. पुढे काव्यरत्नावली ते महाबळपर्यंतचा मार्ग जवळपास ८० फूट रुंद असूनही दोन्ही बाजूंकडील अतिक्रमणाने त्याची रुंदी अवघी ६० फुटापर्यंत मर्यादित राहिली आहे. बेंडाळे चौक ते पांडे डेअर व पुढे सिंधी कॉलनीपर्यंतच्या रस्त्यावरही अतिक्रमण वाढले आहे, तर इच्छादेवी चौक ते डी- मार्टपर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमणामुळे वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे.

महापालिकेची डोळ्यांवर पट्टी

सध्या महापालिकेचा कारभार वाऱ्यावर आहे. वर्षभरापासून महापालिकेत प्रशासक आहेत. निवडणुका कधी होतील, सांगता येत नाही, अशा स्थितीत महापालिकेचा कारभार वाऱ्यावर आहे. निर्नायकी अवस्था झालेल्या महापालिकेने अतिक्रमणाबाबत डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. एखाद्या बातमीनंतर महापालिका प्रशासन जागे होते व तात्पुरत्या कारवाईचा देखावा केला जातो. दुसऱ्या दिवशी ‘जैसे थे’ स्थिती होते. महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग नावाला व हप्ते जमा करायला असल्याची टीका होत असते. सध्याची रस्त्यांवरील अतिक्रमणाची स्थिती पाहता, त्यात तथ्य आढळून येते.

लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद

जळगाव शहरातील ८० टक्के नागरिक प्रामाणिक करदाते आहेत. त्यांच्या करातून महापालिकेचा कारभार चालतो. त्यांना आवश्‍यक सुविधा पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे आणि शहरातील आमदारांसह लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांनी नागरिकांच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे.

मात्र, ठराविक हॉकर्सच्या हितासाठी व त्यांच्याकडून स्वत:चे आर्थिक हित जोपासण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी अशा अतिक्रमणांना आशीर्वाद देत असतात. आता महापालिकेत नगरसेवकांची सभा अस्तित्त्वात नसली, तरीही त्यांचा प्रशासनावर दबाव असतो. त्यातूनच ही अतिक्रमणे फोफावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT