Death esakal
जळगाव

Jalgaon News: जळगावात 2 बाळंतीणीचा मृत्यू; पहिल्या प्रसूतीत शिरसोलीच्या अन चौथ्या प्रसूतीनंतर चोपड्यातील मातेचा मृत्यू

Jalgaon News : माता व बाल मृत्यू रोखण्यासाठी शासन करोडो रुपयांच्या योजना राबवीत असताना, जळगावात दोन बाळंतीणीचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : माता व बाल मृत्यू रोखण्यासाठी शासन करोडो रुपयांच्या योजना राबवीत असताना, जळगावात दोन बाळंतीणीचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. शिरसेाली येथील आरती किशोर बोडखे (वय २५) आणि चोपडा येथील नबाबाई समीर पावरा (वय २८) या दोन महिलांचा समावेश आहे. (Jalgaon 2 women die in pregnancy news)

शिरसोली (ता. जळगाव) येथील माहेरवाशीण आरती किशोर बोडखे (वय २५) यांचे पती रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथे खासगी कंपनीत नोकरी करतात. पहिली प्रसूती असल्याने त्या शिरसोली येथे माहेरी आल्या होत्या. प्रसूतीकळा सुरू झाल्यावर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आरती यांचे सिझेरियन झाल्याने त्यांनी मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर महिलेला झटके येत असल्यामुळे व प्रकृती खालावल्याने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना, या महिलेचा मृत्यू ओढवला. आरती यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, नुकतेच झालेले बाळ असा परिवार आहे.

कुंड्यापाणी (ता. चोपडा) येथील २८ वर्षीय महिलेला तीन मुलांनंतर मुलगी झाली. मुलीचा जन्माने आनंदात असतानाच बाळंतीणीचा मृत्यू झाला. नबाबाई समीर पावरा (वय २८, रा. कुंड्यापाणी, ता. चोपडा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या कुंड्यापाणी येथे पती समीर, तीन मुलांसह राहतात. (latest marathi news)

समीर पावरा गावालगतच शेतीकाम आणि ऊसतोड करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. नबाबाई चौथ्यांदा गरोदर होत्या. त्यांचे ९ महिने भरले होते. रविवारी (ता. १९) सकाळी अचानक घरातच नबाबाई यांची प्रसूती झाली.

वार पडत नाही, म्हणून तत्काळ धानोरा ग्रामीण रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. मात्र, नबाबाई हिची प्रकृती खालावल्याने तिला जळगावच्या शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. जळगावला नेत असतानाच, वाटेतच नबाबाई यांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT