dam (file photo) esakal
जळगाव

Jalgaon Water Shortage: जिल्ह्यातील धरणांत केवळ 24 टक्के साठा; जून संपला तरी 85 गावांत 112 टँकरद्वारे पाणीपुरवठा

Water Shortage : पावसाळ्याचा जून महिना संपला, तरी जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Water Shortage : पावसाळ्याचा जून महिना संपला, तरी जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही. यामुळे नद्या, नाले अजूनही खळखळून वाहू लागलेले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. जिल्ह्यात जूनअखेर केवळ १६४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. (Jalgaon 24 percent storage in dams in district )

एका टँकरची घट

जिल्ह्यातील ९४ गावांमध्ये पाणीटंचाई होती. त्या गावांत ११३ टँकर सुरू होते. १६६ गावांत १८६ विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. १६४ मिलिमीटर पाऊस जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास पुरेसा नाही. जूनमध्ये केवळ १० दिवस, तोही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मात्र, अजूनही हवेतील दमटपणा गेलेला नाही.

अजूनही घरात कुलर, एसीची गरज भासतेच. झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी ५५ टक्के पेरण्या केल्या आहेत. सध्या जिल्ह्यात रोज काही मिनिटे जोरदार पाऊस होत आहे. शेतकऱ्यांनी पेरण्यांना वेग दिला आहे. येत्या १० जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

मागील वर्षापेक्षा ५ टक्के साठा कमी

मागील वर्षी (२०२३) जिल्ह्यातील सर्व धरणांत २८.१ टक्के जलसाठा होता. यंदा तो केवळ २४ टक्केच आहे. यामुळे अजून दमदार पाऊस होऊन नद्या, नाले वाहिले, तरच धरणातील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. (latest marathi news)

जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील साठा असा

धरणाचे नाव--जलसाठा टक्के यंदाचा--मागील वर्षाचा जलसाठा

हतनूर--२५.०२--३८.४३

गिरणा--११.१९--२१.७८

वाघूर--५४.२०--५७.६३

मध्यमप्रकल्प

गुळ--४५.१९--६०.६४

अग्नावती--०--०

हिवरा--०--०

भोकरबारी--०--०

बोरी--०--०

अंजनी--०.२५--८.७०

मन्याड--०--६.०३

अभोरा--६१.३७--५३.०९

मंगरूळ--५२.१८--३९.९४

सुकी--८२.०८--५८.५५

मोर--६६.६०--६२.२४

बहुळा--३.७९--१६.१२

तोंडापूर--१७.३६--२४.०१

शेळगाव--३५.३४--०

एकूण--२४ टक्के--२८ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: एरंडोल येथे पोलीस स्टेशनच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात गुरु गौरव कार्यक्रमाचे आयोजन

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

'या' नक्षत्रांमध्ये जन्मलेली मुलं असतात अतिशय भाग्यशाली; सौंदर्य, यश आणि धनसंपत्तीने होतात समृद्ध

SCROLL FOR NEXT