team of forest department along with suspect and timber seized in case of illegal transportation
team of forest department along with suspect and timber seized in case of illegal transportation esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कोरपावली शिवारातून 30 हजारांचे लाकूड जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील मोहराळा ते कोरपावली रस्त्यावर कोरपावली शिवारातून बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून त्यांची अवैध वाहतूक करताना यावल वन विभागाच्या पथकाने ट्रॅक्टरचालकावर कारवाई केली आहे. यात ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालकाला अटक करण्यात आली आहे. कोरपावली (ता. यावल) शिवारात बेकायदेशीर वृक्षतोड करून त्यांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख यांना मिळाली होती. (Jalgaon 30 thousand worth of wood seized from Korpawali Shivar)

तेव्हा या मिळालेल्या गुप्त बातमीवरून आदेशावरून मोहराळा ते कोरपावली या रस्त्यावर रविवारी (ता. १७) वन विभागाने सापळा लावला. या रस्त्यावर सायंकाळी पाचच्या दरम्यान ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९, बीजी ६२१०) हे अवैध लाकडांची वाहतूक करताना मिळून आले. या वेळी ट्रॅक्टरचालकाकडे लाकूड वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांच्याकडे परवाना नव्हता.

तेव्हा पंचनामा करून ट्रॅक्टर जप्त करून यावल वन विभागाच्या वनउपज केंद्रात लावण्यात आले व ट्रॅक्टरसह चालक खलील रफिक तडवी (रा. कोरपावली) याला अटक केली आहे.

या कारवाईत अंजन, निम इमारती लाकूड आणि टॅक्टर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आले आहे. या प्रकरणी वाहन चालक खलील तडवी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...यांनी केली कारवाई

ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पश्चिम वनक्षेत्रपाल सुनील भिलावे, यावल पूर्व वनक्षेत्रपाल स्वप्नील फटांगरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड व अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT