School Teacher esakal
जळगाव

Jalgaon News : वेतनासाठी 49 कोटी 52 लाख 69 हजार मंजूर; शिक्षकांचा वेतन प्रश्न सुटल्याने मराठी नववर्षानंतर हर्ष उल्हास

Jalgaon News : राज्यातील शिक्षकांना मार्च एंडिंगचा फटका बसला. त्यामुळे काही ठिकाणी वेतन न झाल्याने शिक्षकांचे नववर्ष अंधारात गेले.

उमेश काटे

अमळनेर : राज्यातील शिक्षकांना मार्च एंडिंगचा फटका बसला. त्यामुळे काही ठिकाणी वेतन न झाल्याने शिक्षकांचे नववर्ष अंधारात गेले. लवकर वेतन व्हावे, यासाठी माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह राज्य सैनिकी शाळा कृती समितीने पाठपुरावा केला. त्याला यश आले असून, शासनाने आता एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या वेतनासाठी ४९ कोटी ५२ लाख ६९ हजार रुपये मंजूर केला आहेत. (Jalgaon 49 crore 52 lakh 69 thousand approved for salary Salary problem of teachers solved)

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव गोविंद कांबळे यांनी वेतन निधी वितरणाचे शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यामुळे राज्यातील २३१ शाळांमधील शिक्षकांचा वेतन प्रश्न सुटल्याने मराठी नववर्षानंतर हर्ष उल्हास होणार आहे. दरवर्षीच्या अर्थसंकल्पात वेतन निधीची तरतूद कमी होत असल्याने या तिन्ही लेखाशीर्षकावरील शिक्षकांचे वेतन अनियमित होते.

हीच बाब ओळखून यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद व्हावी, यासाठी वेळोवेळी शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा सुरू होता. याचेच फलित म्हणून शिक्षकांच्या वेतनासाठी ४९ कोटी ५२ लाख ६९ हजार वेतन निधी मंजूर झाला.

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सर्वसाधारण शिक्षण या मुख्य शीर्षांतर्गत शालेय शिक्षण विभागातर्फे अंमलबजावणी होत असलेल्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नवीन अर्थसंकल्पात २०२४ -२५ या आर्थिक वर्षासाठी तिन्ही लेखाशीर्षासाठी १४८ कोटी ५८ लाख ९ हजार रुपयांची वेतन निधीची तरतूद केली आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या वेतनासाठी निधी दिला आहे. (Latest Marathi News)

शिक्षण या मुख्य लेखाशीर्षांतर्गत वित्त विभागाने अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर (बिम्स) वितरणासाठी उपलब्ध करून दिल्याप्रमाणे वेतनासाठी ४९ कोटी ५२ लाख ६९ हजार रुपयांचा वेतन निधी मंजूर केला आहे. यात सैनिकी शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ३७ कोटी ६२ लाख ९९ हजार वेतन निधींपैकी १२ कोटी ५४ लाख ३३ हजार वेतन.

सर्वसाधारण माध्यमिक शाळांमधील कर्मचाऱ्यांसाठी १०४ कोटी ८१ लाख ८६ हजार वेतन निधींपैकी ३४ कोटी ९३ लाख ९५ हजार वेतन, तर अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना ६ कोटी १३ लाख २४ हजार वेतन निधींपैकी २ कोटी ४ लाख ४१ हजार रुपयांचा वेतन निधी मंजूर झाला आहे.

लेखाशीर्ष- शाळा संख्या- शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संख्या- वेतन निधी मंजूर

२२०२ एच ९७३- २० सैनिकी शाळा- ३०० कर्मचारी- १२ कोटी ५४ लाख ३३ हजार रुपये

२२०२/१९०१- १९६ माध्यमिक शाळा- ९९० कर्मचारी- ३४ कोटी ९३ लाख ९५ हजार

२२०२/१९४८- १४ उच्च माध्यमिक शाळा- ३६ कर्मचारी- २ कोटी ४ लाख ४१ हजार रुपये

------------------------------------

एकूण : १ हजार ३२६ शिक्षक- वेतन निधी मंजूर-४९ कोटी ५२ लाख ६९ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT