Supply Monitoring Officer Ravindra Mahadik while distributing e-pos machine to cheap grain shopkeeper at Tehsil office.
Supply Monitoring Officer Ravindra Mahadik while distributing e-pos machine to cheap grain shopkeeper at Tehsil office. esakal
जळगाव

Jalgaon Ration Shop : रेशन दुकानदारांना फोरजी ई-पॉस मशीन; पारोळ्यात वितरण

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : रेशन दुकानातून धान्य घेताना बोटाचे ठसे ई-पाॅज मशिनवर येत नाहीत म्हणून रेशन धान्य दुकानातून रिकाम्या हातानी लाभार्थ्यांना परत यावे लागत होते. बऱ्याचदा स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये ‘तू-तू मै-मै’ होत असल्याचा प्रसंग निर्माण होत होता. मात्र स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थी यांच्यातील वितरण व्यवस्था सुलभ व्हावी. (Jalgaon 4G e-pos machine for ration shopkeeper Delivery in Parole city)

यासाठी येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी (ता. १२) तालुक्यातील १३० स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पाॅज मशिनचे वाटप करण्यात येऊन त्याची हाताळणी कशी करावी? याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षण अधिकारी रवींद्र महाडिक, पुरवठा निरीक्षक विश्वजीत गिरासे कर्मचारी भूषण पवार, संदीप पाटील व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.

या वेळी पुरवठा विभागाकडून पुरविण्यात आलेले फोर-जी ई-पाॅज मशीन याचा वापर याबाबत माहिती व प्रशिक्षण तहसील कार्यालयात देण्यात आले. या वेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व दुकानदार उपस्थित होते. दरम्यान तालुक्यात अंत्योदय ७ हजार ३४० तर प्राधान्य २३ हजार ७९२ अशी एकूण ३१ हजार १३२ कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून वितरण व्यवस्था पुरविण्यात येते.

तांत्रिक त्रुटी दूर

रेशन दुकानदारांना जुन्या टूजी ई-पॉस मशिनमधील तांत्रिक त्रुटींमुळे धान्य वितरण करण्यात अडचणी येत आहेत. याबाबत रेशन दुकानदार संघटनांनी फोरजी ई-पॉस मशिन देण्याची मागणी केली होती. त्यावर तालुक्यात पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना फोर जी ई-पॉस मशीन देण्यात आल्या आहेत. (latest marathi news)

बोटाचे ठसे नसले तरी धान्य मिळणार

रेशन धान्य वितरणात पारदर्शकता येण्यासाठी शासनाने ई-पॉज यंत्रणा कार्यान्वित केली. यामध्ये व्यक्तीच्या बोटांचे ठसे घेऊन त्यांना धान्य दिले जाते. मात्र काही जणांच्या बोटांवरील रेषा पुसट असतात. त्यामुळे ई--पाॅज यंत्रणावर त्यांचे ठसे उमटत नाहीत. मग त्यांना कुटुंबातील अन्य व्यक्तींना आणून त्यांचे ठसे देऊन धान्य घ्यावे लागते.

संबंधित व्यक्तीला धान्य दुकानदार ओळखत असूनही ई-पाॅज यंत्रावरील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना धान्य देता येत नाही. यामुळे नाहक वादाचे प्रसंग उद्भवतात. यासाठी आता शासनाने ‘आय स्कॅनर गन’ हा पर्याय आणला आहे. त्यामुळे बोटाचे ठसे नसले तरी ‘आय स्कॅनर’ने सदर व्यक्तीला धान्य मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT