Maharashtra Assembly Interim Budget 2024 esakal
जळगाव

Maharashtra Assembly Interim Budget 2024 : जालना- जळगाव रेल्वेमार्गासाठी 50 टक्के सहभागाची उपलब्धी

Maharashtra Assembly Interim Budget 2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी चार महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने फार मोठी उपलब्धी नसली तरी, जालना- जळगाव रेल्वेमार्गासाठी राज्याचा ५० टक्के आर्थिक सहभाग म्हणून तरतूद करण्यात आली असून हीच एकमेव दिलासादायक बाब आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी चार महिन्यांसाठीचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. (50 percent participation achieved for Jalna Jalgaon railway line)

जळगाव व पर्यायाने खानदेशासाठी महत्त्वपूर्ण अशा प्रलंबित कृषी विद्यापीठासह, पशुवैद्यकीय महाविद्यालय, जळगावसाठी विस्तारित एमआयडीसीची घोषणा होणे अपेक्षित होते. मात्र, त्याविषयी कोणतीही घोषणा नाही.

जालना- जळगाव रेल्वेमार्गासाठी राज्याने रेल्वेच्या बरोबरीने ५० टक्के निधीची घोषणा केली आहे. अमळनेरला नुकतेच साहित्य संमेलन झाले, त्यात अजित पवारांनीच साने गुरुजींच्या स्मारकासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. (latest marathi news)

त्यानुसार स्मारकाची घोषणा करण्यात आली. मात्र, बहिणाबाई व बालकवी ठोंबरे यांच्या रखडलेल्या स्मारकाविषयी अर्थसंकल्पात उल्लेख नाही.

जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय परिचर्चा महाविद्यालयाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या मोजक्या दोन- तीन प्रमुख बाबींचा समावेश अर्थसंकल्पात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT