Jalgaon Crop Damage (file photo) esakal
जळगाव

Jalgaon Rain Damage Crop : ‘ती’ 69 गावे भरपाईच्या प्रतीक्षेत! पारोळा तालुक्यातील नुकसानग्रस्तांची प्रशासनाला आर्त हाक

Jalgaon News : पारोळा तालुक्यातील ६९ गावांना फेब्रुवारीत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला होता. रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पारोळा तालुक्यातील ६९ गावांना फेब्रुवारीत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला होता. रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेत संबंधित शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पाच महिने उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.

भरपाई मिळावी, अशी मागणी पारोळा व बहादरपूर मंडळासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यातील पारोळा व बहादरपूर मंडळातील करंजी बुद्रुक, दळवेल, मोंढाळे प्र. अ., हिवरखेडे, बहादरपूर, शिरसोदे, महाळपूर, रत्ना पिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री, वसंत नगर, भोलाणे, भिलाली, आंबापिंप्री, जिराळी, इंधवे या परिसरासह सुमारे ६९ गावांना वादळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला होता.

यामुळे सुमारे ५२०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. परिणामी, तब्बल आठ हजार पाचशे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच भिलाली येथे आठ शेळ्या, मेंढ्या दगावल्या होत्या. २६ फेब्रुवारी २०२४ ची रात्र परिसरातील शेतकऱ्यांसाठी काळ रात्र ठरली. वादळी व गारपिटीमुळे पिके जमिनदोस्त झाली. (latest marathi news)

असे असताना आजवर बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. यासाठी कृषी विभाग व महसूल विभागाने योग्य तो समन्वय साधत भरपाईबाबत पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

"फेब्रुवारी रब्बी हंगाम २०२४ या काळात पारोळा व बहादरपूर मंडळासह इतर ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला. या संदर्भात संबंधित बाधित क्षेत्राचे पूर्णपणे पंचनामे झाले आहेत. वरिष्ठांकडे अहवालही पाठविण्यात आला आहे. लवकरच निधी प्राप्त होऊन तो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे."- दत्तात्रेय ढमाळे तालुका कृषी अधिकारी, कृषी कार्यालय, पारोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki bahin Yojana : केवायसी करुनही पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त, शेकडो महिला थेट बालविकास कल्याण केंद्रात घुसल्या अन्...

Shadashtak Yoga 2026: 13 फेब्रुवारीला तयार होणार षडाष्टक योग! मेष राशींबरोबर 'या' 4 राशींचं नशीब उजळणार

New UPI Feature : आता अकाऊंट मध्ये पैसे नसतानाही ऑनलाइन पेमेंट शक्य! UPI च नवं फीचर पाहिलंत का? तुम्हाला काय फायदा होणार?

बांगलादेशला रिप्लेस करणाऱ्या स्कॉटलंडने T20 World Cup साठी जाहीर केला संघ! पाकिस्तानी वंशाच्या अन् न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला संधी

Mhada Homes: सर्वसामान्यांसाठी मोठी पर्वणी! मुंबईत म्हाडासह कोकण मंडळाकडून तब्बल ७ हजार घरांची सोडत; जाणून घ्या कधी आणि कुठे?

SCROLL FOR NEXT