Adhar Update esakal
जळगाव

Adhar Update: साडेचार लाख मुलांचे आधार अपडेट बाकी! बायोमेट्रिक पॅरामीटर्समध्ये होतात बदल; मोठ्यांचे आधार 10 वर्षांनंतर करा अपडेट

Jalgaon News : पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आधार कार्डमध्ये दोनदा बायोमेट्रिक बदल करावे लागतात.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : आपल्यासाठी ‘आधार कार्ड’ आता उपयुक्त कागदपत्र बनले आहे. मुलांचे आधार कार्ड काढल्यानंतर पाच वर्षांनी, तर मोठ्यांचे आधार दहा वर्षांनंतर अपडेट करायला हवे. जिल्ह्यात साडेचार लाख मुलांचे आधारकार्ड अपडेट होणे बाकी असल्याचे सांगण्यात आले. (jalgaon Aadhaar update of four half lakh children pending marathi news)

पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आधार कार्डमध्ये दोनदा बायोमेट्रिक बदल करावे लागतात. हे अपडेट वयाच्या पाचव्या वर्षी आणि पंधराव्या वर्षी केले जातात. हे अपडेट करणे अनिवार्य आहे. मोठ्या लोकांचे आधारकार्ड दहा वर्षांनंतर अपडेट करावे लागते. आधारकार्ड अपडेटसाठी निवास पत्ता पुरावा, वयाच्या पुराव्याची कागदपत्रे आवश्यक आहेत.

ज्या मुलांचे आधारकार्ड पाच वर्षांपूर्वी बनले आहे, त्यांचे बायोमेट्रिक्स म्हणजेच फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांची बाहुली विकसित झालेली नसते, म्हणून नावनोंदणीदरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत, म्हणूनच युआयडीएआयने पाच वर्षांनंतर अपडेट करणे बंधनकारक केले आहे.

पहिल्याच वर्षी लहान मुलांचे आधारकार्ड काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, आधारकार्ड त्यांना पाच वर्षांनंतर अपडेट करावे लागते. त्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. त्याच्या बायोमेट्रिक पॅरामीटर्समध्य बदल केले जातात, म्हणूनच युआयडीएआयने पुन्हा वयाच्या १५ व्या वर्षी बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक केले आहे. (latest marathi news)

महिला व बालविकास विभागांतर्गत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी अंगणवाडीमध्ये करण्यात येत आहे. ही नोंदणी निःशुल्क आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कायमस्वरूपी एक आधार संच बसविला आहे.

त्या ठिकाणी नागरिकांना आधारकार्ड अद्ययावत करता येतील. आधारकार्ड अद्ययावत करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार शुल्क आकारले जाईल. या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी १९४७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'नितीश कुमारजी तुमचं धोतर खेचलं तर...' बुरखा खेचण्यावरुन राखी सावंत भडकली, जाहीर माफीची केली मागणी

तुझा फोन पडला, तर मला सांगू नको... Jasprit Bumrah ची चाहत्याला तंबी अन् मग हिसकावला मोबाईल; Viral Video

Latest Marathi News Live Update : मुंबईतील बांद्रा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

Ashes Test: पुन्हा राडा! ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अम्पायरला घेरले; मिचेल स्टार्कचे वादग्रस्त विधान स्टम्प माईकने टिपले, Viral Clip

SCROLL FOR NEXT