Navalnagar: Car crashed under the bridge. esakal
जळगाव

Jalgaon Accident News : नवलनगरजवळ Car कोसळून अमळनेरचे 3 ठार; 4 जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नाशिककडून अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणारी चारचाकी धुळे तालुक्यातील नवलनगरजवळील छोट्या पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात अमळनेरचे तीनजण ठार झाले. तर चारजण जखमी झाले.

हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास झाला. सरलाबाई पंडित पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (वय ५४), व शाहू विजय पाटील (वय १०, सर्व रा.अमळनेर) अशी मयतांची नावे आहेत. (Jalgaon Accident 3 killed in Amalner after car crash near Naval Nagar 4 injured Jalgaon News)

नाशिक येथून गंधमुक्तीचा कार्यक्रम आटोपून पाटील परिवार कारने (क्र. एमएच ०४-एफझेड ३६८९) अमळनेरकडे येत होता.

कारमध्ये जवळपास सात ते आठ जण होते. वेगाने येणारी कार फागणे-अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळ असलेल्या एका मोरी पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढा भीषण होता की, कारमधील तीन जणांचा मृत्यू झाला.

अपघातात कारमधील चारजण जखमी झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना रूग्णवाहिकेतून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत धुळे तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT