Accident News esakal
जळगाव

Jalgaon Accident News : कुकावलच्या मायलेकास टॅंकरने चिरडले! डॉक्टर जखमी; सारवे, बाभळेनाग फाट्यादरम्यान अपघात

Jalgaon News : या अपघातात डॉक्टरांच्या पत्नी व मुलास मागून येणाऱ्या टँकरखाली चिरडले, तर डॉक्टर जखमी झाले आहेत

सकाळ वृत्तसेवा

पारोळा : तालुक्यातील चिखलोड येथून मित्राचे लग्नकार्य आटोपून एरंडोल येथे मामाच्या भेटीसाठी निघालेल्या डॉक्टर परिवाराची दुचाकी सारवे, बाभळेनाग फाट्यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर मंगळवारी (ता. २३) दुपारी घसरली. या अपघातात डॉक्टरांच्या पत्नी व मुलास मागून येणाऱ्या टँकरखाली चिरडले, तर डॉक्टर जखमी झाले आहेत. (Jalgaon Accident Kukawal mother son crushed by tanker news)

कुकावल (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील गुरांचे डॉ. प्रतीक सुनील पाटील (वय ३०) पत्नी पूनम पाटील (वय २४) व मुलगा अगस्य पाटील (वय एक वर्ष) यांच्यासह ते पारोळा तालुक्यातील चिखलोड येथे आपल्या मित्राच्या लग्नासाठी दुचाकीने (एमएच ३९, एएच ०७०४) आले होते.

लग्नकार्य आटोपून ते दुचाकीने एरंडोल येथे मामाला भेटण्यासाठी निघाले होते. दुपारी तीनच्या सुमारास महामार्ग क्रमांक ५३ वर सारवे, बाभळेनाग फाट्यादरम्यान उन्हामुळे डांबर निघून खडी उखळली होती. त्या ठिकाणी दुचाकी अचानक घसरल्याने ते रस्त्यावर पडले.

त्याचवेळी मागून येणाऱ्या कॅप्सूल टँकर (एमएच ४०, सीटी ४०९७)चे पूनम व अगस्त यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला व डॉ. प्रतीक विरुद्ध दिशेला पडल्याने ते बचावले व फ्रॅक्चर होऊन जखमी झाले आहेत.  (latest marathi news)

खराब रस्त्यामुळे दुचाकी स्लीप झाल्याने ही दुर्दैवी घटना त्यांच्या डोळ्यादेखत झाली. त्यामुळे ते भयभीत झाले होते. जखमी व मृतांना तत्काळ रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत उशिरापर्यंत पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

महामार्गाने घेतला मायलेकाचा जीव

राष्ट्रीय महामार्ग ५३ ने पुन्हा मायलेकाचा जीव घेतल्याचे दिसून आले. महामार्गावर संथगतीने सुरू असलेले काम व रस्ता ओरबडल्या गेल्यामुळे बरेच वाहने सावकाश असतानाही स्लीप होतात. परिणामी, त्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. कुकावल येथील पाटील परिवारातील मायलेक महामार्गाचे बळी ठरल्याचे बोलले जात आहे. महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्यांवर कोणतेही अंकुश नसल्यामुळे नाहक अपघात होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांवर काही ठिकाणी वाहतूक मंदावली, नागरिकांची तारांबळ

हॅप्पी दिवाळी! दिपिका-रणवीरने लेक 'दुआ'सोबत पहिल्यांदाच शेअर केला फोटो....

शेवटच्या ओव्हरमध्ये ४ धावा अन् सामना टाय... BAN vs WI सामन्यात ड्रामा; थरारक सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Deglur ZP Elections : ग्रामीण भागात मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची धामधूम; शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल

PESA Candidates Disqualification : पेसा भरतीतील २३ उमेदवारांचे भवितव्य धोक्यात; दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता कशी करणार?

SCROLL FOR NEXT