accident news esakal
जळगाव

Jalgaon Accident News : दर्शनाहून येणाऱ्या भावंडांच्या दुचाकीला अपघात; तरुणाचा मृत्यू, 2 जखमी

मन्यारखेडा(ता.जळगाव) फाट्याजवळ झालेल्या अपघातात जळगावमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मन्यारखेडा(ता.जळगाव) फाट्याजवळ झालेल्या अपघातात जळगावमधील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.

जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Jalgaon Accident News Two wheeler accident of siblings coming from Darshan Youth killed 2 injured)

शहरातील कंजरवाडा भागातील रहिवासी राजेश माचरे यांचा मुलगा राजेश (वय २३) लहान मुलगा नेहाल (वय-१८) आणि त्याच्या घरी नंदुरबारहून आलेली आतेबहीण उन्नती रविचंद्र तमाईचेकर (वय १२) असे तिघे बहिण- भावंडे सोमवार सुट्टीमुळे शिरसाळा (ता.बोदवड) येथील मारुती मंदिरात दर्शनाहून परतत असताना सकाळी दहाच्या सुमारास मन्यारखेडा फाट्याजवळ दुचाकी अपघात झाला.

ग्रामस्थांनी जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळूंखे यांनी नेहाल माचरे याला मृत घोषीत केले. जखमी अक्षय व उन्नती यांच्यावर उपचार सुरू आहेत. नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंजरवाडा पसरली शोककळा

अपघाताची माहिती कळताच जाखनीनगर कंजरवाड्यातील तरुणांसह ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.

मृत्यूनंतर रुग्णालयात कुटुंबीयांचा आक्रोश होता. मृत नेहाल (वय १८) शहरातील एका फोटो स्टुडिओत काम करून शिक्षण घेत होता. त्याचे वडील राजेश मजुरी करतात.या दुर्घटनेमुळे कंजरवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT