A crop cover used to protect papaya plants from the sun esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी रोपांना क्रॉप कव्हर चा वापर

Jalgaon : उन्हाच्या वाढत्या झळामुळे नवीन लागवड केलेल्या केळी ,पपई आदी पिकांच्या रोपांची अवस्था नाजूक होऊ लागल्याने शेतकरी आता या रोपांना वाचविण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करताना दिसू लागले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

गणपूर, (ता चोपडा) : खानदेशात उन्हाचा पारा आता ४२ अंशावर पोहेचला आहे. उन्हाच्या वाढत्या झळामुळे नवीन लागवड केलेल्या केळी ,पपई आदी पिकांच्या रोपांची अवस्था नाजूक होऊ लागल्याने शेतकरी आता या रोपांना वाचविण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर करताना दिसू लागले आहेत. खानदेशातील वेगवेगळ्या भागात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पपई व केळीच्या रोपांची लागवड केली जाते. (Jalgaon Agriculture News Use of crop cover for plants to avoid heat)

पपई चे पीक नाजूक असल्याने ते उन्हापासून वाचविणे तसे अवघडच काम. हे पिक वाचविण्यासाठी शेतकरी काही वेळा तीन किंवा चारही बाजूला काड्या लावून कागदाचा वापर करून रोपाला संरक्षण देतात.

तयार काड्या व क्रॉप कव्हर चा वापर बाजारात तयार क्रॉप कव्हर आठशे रुपये प्रति हजारी तर काड्या रुपयाला तीन याप्रमाणे मिळतात. त्याचा वापर गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे. बाजारात सर्वत्र या वस्तू मिळू लागल्या आहेत. मजुरांच्या साहाय्याने एका दिवसात हे काम उरकता येते. (latest marathi news)

वन्य प्राण्यांपासून संरक्षण

काही भागात या दिवसात हरिण, ससे हेही पिके फस्त करतात.त्यांच्यापासूनही रोपांचे संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हर चा वापर होऊ लागला आहे.वन्य प्राण्यांनी रोपे कुरतडल्यास ती पुन्हा फुटणे कठीण होते.

"क्रॉप कव्हरचा वापर केल्याने पिकांचे ऊन,व वन्य प्राण्यांपासून संरक्षण तर होतेच त्याचबरोबर क्रॉप कव्हर च्या वापरामुळे रोपाजवळ सावली पडून बाष्पीभवनाचा वेगही मंदावतो .त्याचा पिकाला फायदा होतो." - डॉ रवींद्र निकम (प्रयोगशील शेतकरी,माचला)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT