Jars entered for sale in the market for Akshaya Tritiya. esakal
जळगाव

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेला लागणारी घागर खरेदीची लगबग; यावलच्या बाजारात दाखल

Akshaya Tritiya : चार दिवसांवर असलेला अक्षयतृतीया हा सण खानदेशात उत्साहात साजरा केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

Akshaya Tritiya 2024 : चार दिवसांवर असलेला अक्षयतृतीया हा सण खानदेशात उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त घरोघरी पूर्वजांच्या आठवणीत त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून घागर भरून पूजन करणे, तर्पण करणे आदी विधी करण्यात येतात. त्यामुळे हिंदू धर्मात अक्षयतृतीयेस घरोघरी घागरी व त्यावर ठेवले जाणारे छोटे गाडगे (करे) आणले जाते. ह्या घागरी घरोघरी आणल्या जात असल्याने गावोगावीचे कुंभार समाजबांधव मोठ्या प्रमाणात घागरी बनवतात. (Akshaya Tritiya shopping rush start in yawal )

यावल येथील कुंभार बांधवांनी बनवलेल्या घागरी विक्री करण्यास सुरवात केली आहे. ऐन सणाच्या दिवशी घागरींचा तुटवडा भासू नये, म्हणून नागरिकांचीही खरेदीसाठी लगबग सुरू झालेली दिसून येत आहे. खान्देशात दिवाळीनंतर अक्षयतृतीया अर्थात आखजी सणास अनन्य महत्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हे एक मुहूर्त आहे. सासरी गेलेल्या मुलींनाही माहेरी येण्याचा हा हक्काचा सण असतो. (latest marathi news)

शिवाय घरोघरी पूर्वजांच्या आठवणीत त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून घागर भरुन पूजन केले जाते. ह्या घागरी घरोघरी आणल्या जात असल्याने आणि ऐनआखजीच्या दिवशी खरेदीस झुंबड उडत असल्याने व कधी-कधी तुटवडा भासत असल्याने अनेकांना मिळत नाहीत. त्यासाठी अनेक जन दोन-चार दिवस आधीच घागरी खरेदी करतात. यावल येथील कुंभार समाज बांधवांनी घागरीच्या भट्ट्या उघडल्या असून, विक्रीसदेखील सुरवात केली आहे.

यंदाची किंमत ८० रुपये

येथील बोरावल रस्त्यावरील बबलू कुंभार यांनी सांगितले की, यावर्षी सध्या तरी ८० रुपयांस एक घागर व करे विक्री सुरू आहे. गेल्यावर्षी ऐन अक्षयतृतीयेच्या दिवशी घागरींचा तुटवडा आल्याने घागरींच्या किंमतीत वाढ झालेली होती. काही वेळेस काळ्या घागरी ऐन वेळेवर गेरू लावून लाल रंगवून नाइलाजास्तव पुजन केले जाते. घागरी अथवा मातीचे भांडी प्रत्येक व्यावसायिक कुंभार बांधव बनवतात व भट्टी लावतोच, असे नाही तर समाजबांधवांकडून खरेदी करून ती गावोगावीच्या बाजारात विक्री करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND, 4Th T20I: अर्शदीपने ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा अफलातून कॅच घेतला अन मॅच भारताकडे फिरली; पाहा टर्निंग पाँइंट ठरलेला क्षण

Pune News : पुणे महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी

शूटिंगवरून परतल्यावर रोजची भेट! अभिनेत्री जुई गडकरीचा स्ट्रीट डॉग्स सोबतचा हृदयस्पर्शी प्रवास

Buldhana Crime : मध्य प्रदेश मधील अग्नी शस्त्र निर्मिती; गृह खात्यासाठी ठरतेय डोकेदुखी

Junnar Leopard's : जुन्नर तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे जीवनाधिकार धोक्यात; वन विभागाला तातडीची नोटीस!

SCROLL FOR NEXT