Amol Patil, Vice President of District Bank, speaking on the occasion of Bhoomi Puja of the roads. Neighbor Principal Kiran Deshmukh, Prof. Manoj Patil, Ravindra Jadhav and residents. esakal
जळगाव

Jalgaon News : नवीन वसाहतींच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य : अमोल पाटील

Jalgaon : आरोग्य यांसारख्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहराबाहेर असलेल्या सर्व नवीन वसाहतींमधील रस्ते, गटारी, आरोग्य यांसारख्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले. आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. (Amol Patil statement of Priority to solve problems of new colonies )

अमोल पाटील, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील व नवीन वसाहतींमधील मान्यवरांच्या हस्ते रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. रस्त्यांच्या कामास सुरुवात झाल्याने चिखलामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रस्त्यांच्या कामांसाठी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शहरासह सर्व नवीन वसाहतींमध्ये नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

रस्त्यांचे खोदकाम केल्यामुळे सर्वत्र चिखल निर्माण होऊन रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे घराच्या बाहेर पडणेदेखील मुश्कील झाले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांचे अस्तित्वच संपुष्टात आले होते. म्हणून रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी नवीन वसाहतींमधील रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देत रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमित पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलनदेखील करण्यात आले होते. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. मनोज पाटील यांनी सर्व नवीन वसाहतींमधील रहिवाशांच्या बैठका घेऊन समस्या जाणून घेतल्या होत्या. प्रा. पाटील यांनी आमदार पाटील यांची भेट घेऊन नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या समस्येमुळे रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती. (latest marathi news)

आमदार पाटील यांनी शासकीयस्तरावर पाठपुरावा करून शहरातील नवीन वसाहतींमधील रस्त्यांच्या कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, मनोज पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र जाधव यांच्या उपस्थितीत रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अमोल पाटील यांनी शहरातील सर्व नवीन वसाहतींमधील रहिवाशांना मुलभूत सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार पाटील शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले.

रस्त्यांचे कामे गुणवत्तापूर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी ठेकेदारास दिल्या. यावेळी नवीन वसाहतींमधील रहिवाशांच्यावतीने अमोल पाटील यांचा सत्कार करून आमदार पाटील यांचे आभार मानले. कार्यक्रमाला नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, शिवसेनेचे शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत), युवा सेनेचे माजी तालुकाप्रमुख बबलू

पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, माजी नगरसेवक बबलू चौधरी, शहर संघटक मयूर महाजन, कृष्णा ओतारी, कुणाल पाटील, प्रवाराज पाटील यांच्यासह रहिवासी, पदाधिकारी व पालिका कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, रस्त्यांच्या कामास सुरुवात झाल्याने नवीन वसाहतींमधील रहिवाशांची होणारी गैरसोय दूर होणार असल्याने महिलांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पावसामुळे एरंडोल शहरातील सर्व नवीन वसाहतींमधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.

''नवीन वसाहतींमधील रहिवाशांना सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार चिमणराव पाटील शासकीयस्तरावर पाठपुरावा करीत आहेत. आमदार पाटील यांच्या माध्यमातून व शासनाच्या विविध योजनांमधून नवीन वसाहतींमधील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.''- अमोल पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT