Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Election : लोकसभेची प्रत्यक्ष रणधुमाळी 18 पासून; माघारीसाठी 3 दिवस; 13 मेस मतदान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा निवडणूक प्रक्रिया येत्या गुरुवार (ता. १८)पासून सुरू होणार आहे. यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दोन्ही मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघे आठ दिवस म्हणजेच २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. (Jalgaon and Raver Lok Sabha elections in district will start from next Thursday)

२६ एप्रिलला अर्जांची छाननी होईल. २९ एप्रिलपर्यंत माघारीची मुदत आहे. माघारीनंतर अवघे १३ दिवस प्रचाराला मिळणार आहेत. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ ११ विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण ३,५८२ मतदान केंद्रे येतात. उर्वरित एक विधानसभा मतदारसंघात मलकापूर (जि. बुलढाणा) येथील एकूण ३०४ मतदान केंद्रे रावेर सभा मतदारसंघात समाविष्ट आहेत, असे एकूण ३,८८६ मतदान केंद्रे आहेत.

उमेदवारांना उमेदवारी अर्ज विहित नमुना ‘२ अ’ भरावा लागेल. उमेदवारास शपथ/दृढकथन करावे लागेल. शपथपत्र नमुना-२६ प्रथम वर्ग दंडाधिकारी/नोटरी/ओथ कमिशनरांच्या समक्ष स्वाक्षरी करून सादर करावे लागेल. मतपत्रिकेवरील फोटोबाबतचे घोषणापत्र, मतपत्रिकेवर नाव कसे असावे, याबाबत उमेदवाराचे लेखी पत्र.

उमेदवारी अर्जासोबत जमा करावयाची अनामत रक्‍कम २५ हजार रुपये, उमेदवार अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती वर्गातील उमेदवार असेल, तर १२ हजार ५०० भरावे लागतील. एक उमेदवार जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज भरू शकतील. तसेच एक उमेदवार दोनपेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज करू शकणार नाही. (Latest Marathi News)

उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा असल्यास एक सूचक, तर अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष व अपक्ष असल्यास एकूण १० सूचक आवश्यक लागतील. राजकीय पक्षांचे उमेदवारांनी पक्षाने प्राधिकृत केल्याबाबत विहित सूचनापत्र (नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी ३ पूर्वी) निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागणार आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात आजअखेर स्त्रिया, पुरुष, तृतीयपंथीयांची मतदार नोंदणी संख्या १९ लाख, ८१ हजार ४७२ असून, रावेर लोकसभा मतदारसंघात १८ लाख ११ हजार ९५१ एवढी नोंद झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर यांनी दिली.

जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण पुरुष मतदार १० लाख ३१ हजार ६० आहेत. महिलांची संख्या ९ लाख ५० हजार ३२९ एवढी आहे. तृतीयपंथी एकूण ८३ आहेत. अशी सर्व मिळून १९ लाख ८१ हजार ४७२ एवढी नोंद आजअखेरपर्यंत आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय संख्या अशी

विधानसभा-- पुरुष--महिला--तृतीयपंथीय-एकूण

जळगाव लोकसभा मतदारसंघ

जळगाव शहर--२०७०१९--१८८११३--३२--३९५१६४

जळगाव ग्रामीण-- १६६३३०--१५५३०२--३--३२१६३५

अमळनेर--१५५२२०--१४६०१०--३--३०१२३३

एरंडोल--१४७४७९--१३८३२२--१०--२८५८११

चाळीसगाव--१८९८०१--१६९८५१--२९--३५९६८१

पाचोरा--१६५२११--१५२७३१--६--३१७९४८

रावेर लोकसभा मतदारसंघ

चोपडा--१६४१५२--१५६५८४--२--३२०७३८

रावेर--१५३८८३--१४४४४७--२--२९८३३२

भुसावळ--१५४०५८--१४३५३९--३७--२९७६३४

जामनेर--१६६८३७--१५४५१९--००--३२१३५६

मुक्ताईनगर--१५१६२८--१४२६८३--७--२९४३१८

मलकापूर--१४६४९६--१३३०७१--६--२७९५७३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : प्रचारसभांमध्ये ‘दोन शहजादे’, ‘मंगळसूत्र’, ‘मच्छी व मटण’, ‘भटकती आत्मा’चा बोलबाला

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Lok Sabha Election: निकालाआधीच राष्ट्रवादीला धक्का! अजित पवार यांच्या जवळच्या उमेदवारावर का दाखल झाला गुन्हा?

T20 World Cup Schedule: ‘टी-20’ वर्ल्ड कपची उत्सुकता शिगेला! अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये रंगणार थरार, पाहा संपूर्ण शेड्युल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT