गणपूर (ता. चोपडा) : येथून जवळ असलेल्या अनेर मध्यम प्रकल्पातील जलसाठा ८८ टक्के झाला आहे. अनेर नदीत सध्या २ हजार ६६० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणातील वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. अनेर धरण परिसरात सोमवारी (ता. २३) चांगला पाऊस झाला. ज्यामुळे धरणाच्या पाण्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रात्रीपासून नदीत पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यासाठी एकूण दहा दरवाज्यांपैकी दोन दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. (aner Madhyam Project 88 percent of water storage farmers were satisfied )
धरणात सध्या २१५.५० मीटर इतकी पाण्याची पातळी झाली आहे. त्यामुळे ४३.६२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या एकूण पाणी पातळीच्या ८८ टक्के धरण भरले आहे. धरणाची पूर्ण पाणी साठवण क्षमता ९२.७० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यामुळे सध्या धरणात येणारे अतिरिक्त पाणी नदीपात्रातून बाहेर काढले जात आहे. सद्यःस्थितीत धरण पात्राच्या परिसरात ६७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. असाच पाऊस होत राहिला तर येत्या पंधरवड्यात धरण शंभर टक्के भरेल, अशी अपेक्षा उपविभागीय अधिकारी पी. बी. पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. (latest marathi news)
शेतकऱ्यांना होणार लाभ
दरम्यान, अनेर धरण भरल्यानंतर त्याच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी देणे सोपे होते. ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ होतो. अनेर डाव्या कालव्यातून गणपूरसह मराठे, शिकावल, लासूर आदी शिवाराला पाणी मिळू शकले. तर उजव्या कालव्यातून शिरपूर तालुक्यातील कुंदे, हिसाळे, तरडी, बबळाज, पिळोदे, होळनांदे, अजंदे यासह इतरही अनेक गावांना लाभ होतो. त्यामुळे येत्या रब्बी हंगामात पिकांसाठी पाणी उपलब्ध झाल्यानंतर हा हंगाम घेणे शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.