Anganwadi Sevika  esakal
जळगाव

Jalgaon Anganwadi Sevika : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा; औद्यगीक न्यायालयाचे आदेश

Anganwadi Sevika : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी, म्हणून सुमारे १२२ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Anganwadi Sevika : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी, म्हणून सुमारे १२२ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅच्युइटीची रक्कम देण्याचा औद्यगीक न्यायालयाने आदेश दिला आहे. (Anganwadi Sevika Clear way for Anganwadi workers to receive gratuity )

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नांना यश आले आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या, तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडीसेविका, मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम मिळावी, म्हणून सुमारे १२२ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता.

कामगार न्यायालयाने सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सुप्रीम कोर्टाने ग्रॅच्युइटीची रक्कम अदा करावी, असा आदेश ३० जानेवारी २०२३ ला राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता. राज्य शासन आणि जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगीक न्यायालयात अपील दाखल केले होते. (latest marathi news)

अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या आणि मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम आधी कोर्टात जमा करा. त्यानंतरच अपील प्रकरणी कामकाज चालविण्यात येईल, असे म्हणत औद्योगीक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक एल. भागवत यांनी अपील फेटाळून लावले आहे. त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी. पाटील यांनी दिली.

या प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. बी. एस. पाटील यांनी कामकाज पाहिले. संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाने व रामकृष्ण बी. पाटील यांनी त्यांना कामकाजात सहकार्य केले. संघटनेने केलेल्या प्रयत्नाला यश आले, म्हणून अंगणवाडीसेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडीसेविकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT