Fund  esakal
जळगाव

Jalgaon News : आशा, गटप्रवर्तकांना दहा लाखांचे सुरक्षाकवच! चोपडा तालुक्यातील 224 आशा, 14 गटप्रवर्तकांना होणार लाभ

Latest Jalgaon News : शासनाच्या या योजनेतचा या चोपडा तालुक्यातील २२४ आशा स्वयंसेविकांना प्रत्येकी दहा लाखांचे सुरक्षाकवच मिळणार असल्याने आशांमधून समाधान व्यक्त केले जाते आहे.

सकाळ वृत्तसेवा

धानोरा (ता. चोपडा) : नागरिकांत आरोग्यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्यादृष्टीने सामाजिक दुवा म्हणून आशा स्वयंसेविका कार्यरत असतात. आरोग्यविषयी वेगवेगळी कामे त्या करीत असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रुग्णालयापर्यंत वेगवेगळ्या अडचणींवर मात करीत स्थानिक पातळीवर या महिला आपले नेमून दिलेले काम कर्त्याव्यदक्षपणे पार पाडतात.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आपले कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास शासन आता दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. शासनाच्या या योजनेतचा या चोपडा तालुक्यातील २२४ आशा स्वयंसेविकांना प्रत्येकी दहा लाखांचे सुरक्षाकवच मिळणार असल्याने आशांमधून समाधान व्यक्त केले जाते आहे. (security cover of one million to group asha promoters)

आरोग्यासंदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय करण्याच्यादृष्टीने आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक महत्त्वाचा सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. आज आशा स्वयंसेविका माता, बालआरोग्य, कुटुंब नियोजन, वेगवेगळ्या आरोग्यविषयक सर्वेसाठी नियमित गृहभेटी देत असतात. शासनाच्या आरोग्याविषयी वेगवेगळ्या योजनांबाबत नागरिकांत जागृती करून मार्गदर्शन करतात.

हे करताना या महिलांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागत असते. पुरुष नसबंदी, असाध्य आजार याबाबत काम करताना मोठी जोखीम पत्करून कामे करावी लागतात. यावेळी स्वतःच्या कुटुंबाचीही पर्वा केलेली नसते. या गोष्टींचा विचार करून शासनाने अखेर त्यांना अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. (latest marathi news)

त्याचबरोबर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. हे सुरक्षाकवच गेल्या एप्रिलपासून लागू होणार आहे. चोपडा तालुक्यातील २२४ आशा स्वयंसेविका व १४ गटप्रवर्तकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

कोरोना काळात उल्लेखनीय काम

कोरोनासारख्या महामारीत अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करीत कर्तव्यात कसूर न करता कोरोना महामारीत उल्लेखनीय काम केले. शासनाच्या आरोग्यविषयक योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी आशा व गटप्रवर्तक महत्त्वाचा दुवा मानला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT