Collector Ayush Prasad, MLA Rajumama Bhole, etc. were present on the occasion of ratha worship, In the second photography artist dancing in front of the chariot esakal
जळगाव

Ashadhi Ekadashi 2024 : ‘जानकाबाई की जय’च्या जयघोषात रथोत्सव!

Jalgaon News : पिंप्राळ्यातील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, पिंप्राळे वाणी पंच मंडळातर्फे आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी (ता. १७) रथाची मिरवणूक काढण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘जानकाबाई की जय’, ‘विठ्ठल रुख्माबाई की जय’, ‘बोला पुंडलिक वरदे... हरिविठ्ठल’, ‘ज्ञानदेव तुकाराम’, असा जयघोष करीत पिंप्राळ्यातील श्री विठ्ठल मंदिर संस्थान, पिंप्राळे वाणी पंच मंडळातर्फे आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी (ता. १७) रथाची मिरवणूक काढण्यात आली. सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम व महापूजा झाली. (Ashadhi Ekadashi 2024)

ऐतिहासिक रथोत्सवात भक्तीचा मेळा रंगला होता. रथाला पानाफुलांनी सजवून, आकर्षक दिव्यांची रोषणाई केली होती. रथोत्सव पाहण्यासाठी खानदेशातील विठ्ठलभक्तांचा जनसागर लोटला होता. पिंप्राळ्यातील जुने ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पहाटे पाचला विठ्ठलांच्या मूर्तीस सौ. श्रद्धा व अक्षय वाणी यांच्या हस्ते महाअभिषेक झाला.

महापूजेस आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक संदीप गावित, महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष अनिकेत पाटील, भालचंद्र पाटील, माजी पोलिसपाटील विष्णू पाटील, अतुल बारी, परशुराम सोमाणी.

चंद्रकांत कापसे, विजय पाटील, मयूर कापसे, प्रकाश कोठारी, माजी महापौर विष्णू भंगाळे, शोभा बारी, हसिनाबी शेख, सुरेश सोनवणे, पुरुषोत्तम सोमाणी, प्रभाकर पाटील, मंगलसिंग पाटील, चंद्रकांत सोनवणे, श्री विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष मोहनदास वाणी, रथोत्सव समितीप्रमुख अनिल वाणी, राकेश वाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते मोगरी लावणाऱ्यांचा सत्कार झाला. (latest marathi news)

आयोजकांतर्फे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. रथापुढील पालखी, भजनी मंडळ, दिंडी, भगवे झेंडे, गुरव मंगल वाद्य, लेझीम, भवानी देवीची सोंगे भाविकांचे आकर्षण ठरले. रथोत्सव सुरू झाल्यानंतर दर्शनासाठी, आरती व नैवेद्य देण्यासाठी महिला भावीकांनी गर्दी केली होती. पंजारीचा प्रसाद, फळे भाविकांना रथातून देण्यात येत होती. रथोत्सवाच्या मार्गावर महिलांनी रांगोळ्या काढून रस्ते सजविले होते. अनेक ठिकाणी स्वागत कमानी लावल्या होत्या.

रथ कलंडला, सुदैवाने हानी नाही

दुपारी अडीचच्या सुमारास साथी मित्रमंडळाजवळील रस्त्याच्या उतारावरून रथ ओढला जात असताना, उतारावर वेगात असलेला रथ भाविकांच्या आटोक्यात न आल्यामुळे रथाचे चाक गटारीत गेले. त्यामुळे रथ थेट इमारतीवर जाऊन आदळला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. गटारात अडकलेल्या रथाची चाके काढण्यासाठी भाविकांना चांगलीच कसरत करावी लागली.

मात्र, त्यांच्याकडून रथाची चाके न निघाल्याने आमदार भोळे यांनी अखेर क्रेन व जेसीबी मागविला. जेसीबीच्या सहाय्याने रथाची चाके गटारातून बाहेर काढण्यात आली. या वेळी पोलिस बंदोबस्त होता. त्यानंतर रथ पुन्हा मार्गस्थ झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रथाचे सोमाणी व्यापारी संकुलाजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भागातील मुख्य चौकात आगमन झाले.

तेथे विठ्ठलभक्तांचा मेळा जमला होता. सुमारे तासभर तेथे विठ्ठलभक्तांनी दर्शन घेतले. तेथून तो परतीच्या मार्गाला लागला. रथोत्सवानिमित्त पिंप्राळ्याच्या मुख्य रस्त्यावरील श्री भवानीमाता मंदिरापासून मुख्य चौकापर्यंत व्यावसायिकांनी विविध वस्तू, खाद्यपदार्थ, खेळणी विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patna Road Accident : गंगा नदीत स्नानासाठी जाताना काळाचा घाला! ट्रक-ऑटोच्या भीषण धडकेत 7 महिला जागीच ठार; 4 जणांची प्रकृती गंभीर

स्टार प्रवाहसाठी मालिका नव्हे प्रोडक्शन हाउस महत्वाचं; प्राइम टाइमसाठी टॉप ५ मधली मालिका करणार बंद, नेटकरी म्हणतात- आताच तर...

Marbat 2025: सगळं अशुभ,अमंगळ घेऊन जा..गे मारबत! कोण होत्या राणी बाकाबाई भोसले ज्यांच्यामुळे नागपुरात सुरू झाला अनोखा मारबत?

खुशखबर! Oneplus 13 स्मार्टफोनचा दर उतरला; मिळतोय हजारो रुपयांचा डिस्काउंट; 24GB रॅमचा मोबाईल किंमत फक्त...

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला टीम इंडियात संधी मिळाली असती, पण कोणाचा 'हट्ट' नडला? इतर संघांपेक्षा वेगळं करण्यासाठी गेले अन्...

SCROLL FOR NEXT