A banana garden blackened by the heat of the sun. esakal
जळगाव

Jalgaon Banana News : रणरणत्या उन्हाचा केळी बागांना फटका; लोणीसह परिसरातील अडावद

Jalgaon Banana : लोणीसह परिसरातील अडावद, धानोरा, पंचक, खर्डी, वरगव्हाण, बिडगाव, देवगाव, पारगाव या गावांमधील केळीबागांना उन्हाचा फटका बसला आहे.

विजय पाटील

Jalgaon Banana News : लोणीसह परिसरातील अडावद, धानोरा, पंचक, खर्डी, वरगव्हाण, बिडगाव, देवगाव, पारगाव या गावांमधील केळीबागांना उन्हाचा फटका बसला आहे. त्यामुळे केळी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, शेतकरी रात्रंदिवस या केळीबागा वाचविण्यासाठी धडपड करतानाही दिसून येत आहेत. चोपडा तालुक्यात केळीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ( Banana orchard damage by scorching heat )

मात्र, दिवसेंदिवस वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील इतर ठिकाणांच्यासह लोणी परिसरातील केळीबागांनादेखील मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन परिणामी उत्पन्न कमी येणार आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस जमिनीतील पाण्याची पातळीदेखील खालावत आहे.

हीदेखील गोष्ट बळीराज्याच्या चिंतेत भर टाकणारी आहे. शेतातील उभ्या असलेल्या केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकरी बांधवांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यात केळीच्या चारही बाजूंनी हिरव्या रंगाच्या नेट लावणे सुरू आहे. त्यामुळे कडक उन्हापासून व उष्ण वाऱ्यापासून केळीबागांचे रक्षण होईल. (latest marathi news)

नुकसानामुळे शेतकरी चिंतित

बळीराज्याच्या मागील समस्या काही कमी व्हायला तयार नाहीत. लोणीसह परिसरातील अडावद, धानोरा, खर्डी, पंचक, बिडगावसह आजूबाजूच्या गावांतील बोअरवेल व विहिरींची जलपातळी खालावत आहे. त्यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाचीदेखील भर पडली आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात सतत वाढ होत आहे. तापमान ४५ ते ४७ अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे केळीचे घड सटकणे व केळीची पाने काळी पडणे आदी समस्यांनी शेतकरी चिंतित दिसत आहेत.

पाणीपातळी खालावली

लोणी, अडावद, धानोरासह परिसरातील गावांमधील बोअरवेल व विहिरींची पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. १७० ते २०० फुटांवर असणारी पाण्याची पातळी आता २५० ते ३५० फुटांवर पोहोचली आहे. बऱ्याच ठिकाणी केळीच्या बागा वाचविण्यासाठी दुसरी बोअरवेल केल्यावरही पाणी लागेल, याची शाश्वती नाही. त्यामुळे पैसेही वाया जात आहेत व पदरी निराशा येत आहे. मोठ्या कष्टाने जगविलेल्या केळीच्या बागा शेतकरी बांधवांच्या डोळ्यादेखत जळत आहेत. त्यामुळे या केळीच्या बागांना वाचवायचे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार वाढीसह उघडला; निफ्टी 80 अंकांनी वधारला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेणार? BCCI ने स्पष्ट केली भूमिका; ही त्यांची शेवटची मालिका...

Zilla Parishad Politics : जिल्हा परिषदेसाठी कायपण! ‘सरकार’, ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार ‘कुणबी’; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले

Missing Lawyer Case : तीन महिन्यांपासून वकील बेपत्ता, शिंदे गटाच्या 'या' आमदारावर गंभीर आरोप; किशोरी आरडे म्हणाल्या, 'माझ्या पतीच्या जीवाला..'

Latest Marathi News Live Update : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणासंदर्भात एसआयटी/सीआयडीने अटक केलेल्या श्यामकानु महंता, सिद्धार्थ शर्मा आणि इतरांना आज न्यायालयात हजर करणार

SCROLL FOR NEXT