Bunches of bananas covered with banana leaves and bunches of thinly fallen bananas due to the heat and low water content of the 'May hit'. esakal
जळगाव

Jalgaon Banana Crop : ‘मे हिट’च्या तडाख्याने केळी बागांना फटका; घट सटकण्याचे प्रमाण वाढले

Banana Crop : चांगदेवसह परिसर केळी लागवडीबाबत जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. परिसरातील सर्व आर्थिक उलाढाली प्रामुख्याने केळीच्या पिकावरच आधारित आहेत.

संदीप शिंपी

Jalgaon Banana Crop : चांगदेवसह परिसर केळी लागवडीबाबत जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. परिसरातील सर्व आर्थिक उलाढाली प्रामुख्याने केळीच्या पिकावरच आधारित आहेत. मात्र काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ४२ ते ४६ अंशांपर्यंत तापमान गेल्याने केळीला मोठा फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या ‘मे हिट’च्या तापमानामुळे केळीवर विपरीत परिणाम होत आहे. (jalgaon Banana orchard damage due to May heat )

केळीस मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. या पिकाला पाणीच गरजेचे असताना त्यातच विहिरींच्या भूजल पातळीत घट झाल्याने विहिरींच्या पाण्याचे टप्पे पडत असून, मेच्या भर उन्हाळ्यात केळीला कमी-अधिक प्रमाणात पाणी दिले जात आहे. पाणी हाच केळीचा ‘आत्मा’ असताना पाणी कमी प्रमाणात असल्याने व ‘मे’चा उन्हाचा कडक तडाखा सुरू असल्याने केळीची स्थिती खालावली आहे. त्याचा थेट उत्पादनावर परिणाम झाला आहे.

जर पाऊस उशिरा सुरू झाला तर कूपनलिका व विहिरींच्या जलपातळीत कमालीची घसरण होऊन केळीची स्थिती अजूनही बिघडेल, अशी स्थिती आहे. केळी पीक अत्यंत नाजूक असल्याने वाढत्या तापमानामुळे केळीचे घड आपोआप सटकण्याचे प्रमाण वाढले असून, बागेच्या सभोवतालची झाडे वाळण्यास आता सुरवात झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केळी पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (latest marathi news)

काही शेतकऱ्यांचे घड झाडावरून आपोआप गळत असल्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी केळीच्या घडांना झाकण्यासाठी केळीच्या पत्तीचा उपयोग करून घड झाकण्याची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी ग्रीन नेटचा वापर करून बागेच्या चोहोबाजूंनी ग्रीन नेट लावून केळीला वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे तर काहींनी प्लास्टिक पन्नीचा वापर करुन केळीचे घड झाकले आहे.

बळीराजा हवालदिल

केळी हे परिसरातील प्रमुख पीक असल्याने शेतकरी ‘मे हिट’ आणि विहिरींच्या भूजल पातळीमुळे चिंताग्रस्त बनला आहे. या पिकासाठी लागणारा खर्च अमाप असून शेतकरी पेरणीपासून ते पीक हातात येईपर्यंत पैसा खर्च करतो. यासाठी बँक कर्ज, सावकारी कर्ज काढूनही सर्व व्यवस्था केली जाते. पण जर निसर्गाकडूनच साथ मिळत नसल्याने पिकाचे उत्पन्न घटते व तो कर्जाच्या विळख्यात सापडतो. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. लागवडीचा खर्च मिळणेसुद्धा जिकरीचे जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT