Archive photo of a railway wagon rake at Keli Maldhakka. esakal
जळगाव

SAKAL Impact : ..अखेर वेळेपूर्वीच व्हीपीयू वॅगन फलाटावर; निंभोरा रेल्वेस्थानकावरून केळी रेक दिल्लीकडे

SAKAL Impact : लाखोंचा फटका बसल्याची वस्तुस्थिती ‘सकाळ’ने सर्वप्रथम ठळकपणे मांडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने केळीसाठी वॅगन रेक वेळेपूर्वीच उपलब्ध करून दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

SAKAL Impact : रेल्वेच्या गलथान कारभाराने केळी उत्पादकांना लाखोंचा फटका बसल्याची वस्तुस्थिती ‘सकाळ’ने सर्वप्रथम ठळकपणे मांडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने केळीसाठी वॅगन रेक वेळेपूर्वीच उपलब्ध करून दिले आहे. निंभोरा रेल्वेस्थानकावरून केळी परप्रांतात पाठविण्यासाठी वॅगन रेक पाठविण्यात आले. ( Banana wagon leave Nimbhora railway station to Delhi )

परंतु दोन्ही वेळा रेक वेळेवर न मिळाल्याने तब्बल २४ तास निंभोरा स्थानकावर भरल्यानंतरही पडून होता. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना रेल्वे प्रशासनामुळे तोटा सहन करावा लागला. याबाबत फळबागायतदार शेतकरी मंडळ व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे व राजकीय लोकप्रतिनिधींकडे विनंती वजा मागणी केली होती. (latest marathi news)

तसेच सर्वप्रथम ‘सकाळ’मध्ये याबाबत ठळक प्रसिद्धी झाल्याने या बाबतची रेल्वे प्रशासनाने दखल घेत शनिवारी (ता. २५) भरला जाणारा तिसरा वॅगन्स रेक आधीच निंभोरा रेल्वेस्थानकावर उपलब्ध झाला आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळून यापुढेही प्रत्येक वॅगन रेक वेळेवर मिळून वेळेवर रवाना व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून रेल्वे प्रशासनाचे व राजकीय लोकप्रतिनिधींचे सहकार्य मिळाल्याने रेल्वे वॅगन आधीच मिळाले आहे. सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT