woman was beaten
woman was beaten sakal
जळगाव

जळगाव : व्याजाच्या पैशांसाठी विवाहितेसह वडीलांना बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील बालाजी मंदिर परिसरात उसनवारीच्या पैशांच्या वादातून विवाहितेसह तिच्या वडिलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शनिपेठ पोलिसात याप्रकरणी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. व्याजाच्या पैशांच्या वसुलीवरुन हा वाद झाल्याची सांगण्यात आले. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील रथचौक परिसरात ज्योती अशोक साळुंखे (वय ४०) कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ज्योती साळुंखे यांनी किरण लिलाधर सैंदाणे (रा. जैनाबाद) यांची बहिण गुड्डी कैलास इंगळे हिच्याकडून वीस हजार रुपये उसनवार घेतले आहे. हे पैसे व्याजासह परत करावे, या कारणावरुन किरण सैंदाणे, सागर सैंदाणे, कल्पना लिलाधर सैंदाणे व शेखर हरी सपकाळे (सर्व रा. जैनाबाद) अशा चार संशयितांनी मंगळवारी (ता. १६) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बालाजी मंदिर परिसरातील पुलावर ज्योती साळुंखे यांना मारहाण केली. यादरम्यान किरण याने ज्योती यांच्या पोटावर पाठीवर दुखापत केली.

यावेळी ज्योतीचे वडील विश्वास भोजू रोकडे यांनाही कल्पना सैंदाणे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. घटनेत ज्योती साळुंखे जखमी झाल्या असून त्यांच्या तक्रारीवरुन किरण सैंदाणे, सागर सैंदाणे, कल्पना लिलाधर सैंदाणे व शेखर हरी सपकाळे (सर्व रा. जैनाबाद) अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रकाश पाटील करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT