Gharkul Yojana esakal
जळगाव

GharKul Yojana : घरकुल योजनेतील लाभार्थी ‘रोहयो’ अनुदानापासून वंचित! बोदवड तालुक्यात तेराशेवर लाभार्थी अडचणीत

Jalgaon News : तालुक्याला ५१ खेडे लागून आहेत. यामध्ये ३९ ग्रामपंचायती असून, या ग्रामीण भागात सद्यस्थितीत ओबीसी कोट्यातून १ हजार ३५० घरकुल बाधकामे सुरू आहेत.

अमोल आमोदकर

Jalgaon News : तालुक्याला ५१ खेडे लागून आहेत. यामध्ये ३९ ग्रामपंचायती असून, या ग्रामीण भागात सद्यस्थितीत ओबीसी कोट्यातून १ हजार ३५० घरकुल बाधकामे सुरू आहेत. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून रोजगार हमी योजनेंतर्गत २३ हजार रुपये अनुदानापासून लाभार्थी वंचित आहेत. ओबीसी कोट्यातून १ हजार ३५० घरकुल बाधकामे सुरू असून, दारिद्र्य रेषेखालील यादीमध्ये ज्याचे नाव समाविष्ट आहे. (Beneficiaries of Gharkul Yojana deprived of Rohyo subsidy)

त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळतो. सद्यस्थितीत ऐन पावसाळ्याच्या तोंडावर घरकुल बाधकाम सुरू करण्याची परवानगी तालुक्यातील लाभार्थ्यांना देण्यात आली आहे. हक्काचे घर होणार, या आशेने लाभार्थ्यांनी आपले जुने घर तोडून घरकुल बाधकाम सुरू केले. शासन घरकुल बाधकाम सुरू करताना घराचा पाया खोदकाम व अन्य मजुरीचे काम करण्यासाठी घरकुल लाभार्थ्याला रोजगार हमी योजनेंतर्गत २३ हजार रूपयांचा धनादेश पंचायत समितीकडून देण्यात येतो.

हप्त्याला ८ आठ हजार रूपये मजुरी, तर २९७ रूपये रोज दिला जातो. पहिल्या मस्टर हप्त्यात चार मजुरांची मजुरी निघते. दुसऱ्या मस्टर हप्ता तीन मजुराची मजुरी असे मस्टर रोजगार सेवक मजुराचे भरून त्या लाभार्थींला रोजगार हमी योजनेंतर्गत मिळणारे २३ हजार रुपये मिळवून देतो. यामागे शासनाचे धोरण असे आहे.

लाभार्थी हा मजूर वर्गातील असल्याने त्याने व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी स्वत: काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा, असे उद्दिष्ट यामागे शासनाचे आहे. मात्र या धोरणाची पायमल्ली होत असून, गेल्या तीन, चार महिन्यांपासून घरकुल लाभार्थी रोजगार हमी अनुदान मिळालेच नाही. यामुळे त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे पावसाळा सुरू असून, शेतीच्या कामांना वेग आला आहे. (latest marathi news)

निदान, कोळपणीआदी शेतीची कामे जोर धरत आहे. शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने मजुरीचा दर जास्तीचा असताना स्वतत:च्या घराचे स्वप्न उराशी असलेल्या घरकुल लाभार्थी मजूर शेतीत मजुरी करण्यासाठी जाऊ शकत नाही. कारण त्याने त्याचे घर मोडून उघड्यावर झोपड्यात आपला संसार थाटला आहे.

अशा स्थितीत काय करावे, असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान, प्रत्येकी मस्टरला दोन किंवा एका मजुराची हप्त्याची मजुरी या यंत्रणेत असलेले शासनाचे धार्जिणे घेत असल्याची चर्चा काही लाभार्थ्यांमध्ये आहे.

अत्यल्प अनुदानात कसे होणार घर?

या घरकुल बाधकाम करण्यासाठी शासनाकडून लाभार्थ्याला १ लाख २० हजार रूपये मिळतात. पहिला धनादेश १५ हजार, दुसरा दोन महिन्याने ४५ हजार, तिसरा काम पूर्ण झाल्यावर ४० हजार तर रोजगार हमी योजनेचे २३ हजार असे एकूण १ लाख ४३ हजार मिळतात. आजच्या महागाईच्या काळात मजुरी, बाधकाम साहित्याचे आभाळाला भिडले असून, ही रक्कम पुरेशी नसल्याने शासनाने यात वाढ करावी, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांमधून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT