MP Smita Wagh, Minister Girish Mahajan, MLA Sanjay Savkare, MLA Suresh Bhole, MLA Chandrakant Patil, MLA Mangesh Chavan etc. giving statement of demands to DRM Iti Pandey. esakal
जळगाव

Jalgaon News : रेल्वेला बसस्थानकाची जागा देण्याबाबत अनुकूलता

Jalgaon News : भुसावळ येथील रेल्वेस्थानकाचे पुर्ननिर्माण होत असून, त्या अंतर्गत रेल्वेस्थानकाचा विकास होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : येथील रेल्वेस्थानकाचे पुर्ननिर्माण होत असून, त्या अंतर्गत रेल्वेस्थानकाचा विकास होणार आहे. या अनुषंगाने रविवारी (ता. २३) लोकप्रतिनिधी व डीआरएम यांच्यासोबतच्या बैठकीत बसस्थानकाची जागा रेल्वेला व बसस्थानकासमोरील रेल्वेची जागा बसस्थानकाला देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. (Bhusawal Favorable to give bus stand site to Railways)

दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासन व रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. महिनाभरानंतर त्यास मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.

कंटेनर डेपो सुरू व्हावा

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शहरात कंटेनर डेपो सुरू करण्याची मागणी केली. कंटेनर डेपो सुरू झाल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, असेही ते म्हणाले. बोदवड येथील आरयूबी बोगद्याचा प्रश्न, सावदा रेल्वेस्थानकावरील मालधक्यावर शेडची गरज असून, पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे तत्काळ शेडची निर्मिती करावी, जेणेकरून गैरसोय होणार नाही, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.

‘मेमू’ची वेळ बदलवा : आमदार चव्हाण

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी महाराष्ट्र एक्स्प्रेस व देवळाली-भुसावळ मेमू गाडीच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली. या गाडीची वेळ गैरसोयीची असल्याने अप-डाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्रवाशांना सुविधा मिळण्यासाठी प्राधान्य द्यावे, असेही ते म्हणाले. (latest marathi news)

आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव रेल्वेस्थानकाच्या अद्यावतीकरणाचा मुद्दा उपस्थित करून शेडची मागणी केली. प्रवाशांना सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन करावे, असे खासदार स्मिता वाघ म्हणाल्या. पाचोरा-जामनेर नवीन ब्रॉड गेज लाईनसाठी नवीन भूसंपादन होणार असून, या कामाचे टेंडर निघाल्याचे डीआरएम म्हणाल्या.

यांची होती बैठकीला उपस्थिती

बैठकीला मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, डीआरएम इति पाण्डेय, एडीआरएम सुनील कुमार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार, वरिष्ठ मंडल अभियंता तरुण दंडोतिया व अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Rainfall: अर्धे वरीस बरसताहेत सरी! मराठवाड्यामध्ये कोसळला दीडशे टक्के पाऊस

Solapur Crime:'साेलापुरात विवाहितेने संपवले जीवन'; पत्नीच्या माहेरी न कळविताच अंत्यविधीची तयारी, नेमकं काय घडलं?

Nice Dp! पत्नीला मित्राचा मेसेज आला अन् पतीने गळा आवळून जीवघेणा हल्ला केला; धक्कादायक घटना समोर...

Solapur Accident: देवदर्शन अन् काळाचा घाला ! 'बल्करच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार'; अक्कलकोट रोडवरील घटना..

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात सहभागी असलेल्या नेत्यांवर गुन्हा दाखल, हिंगणा पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT