A speed breaker been created on the road near Bhopura Chowk. esakal
जळगाव

Jalgaon News : दुखणे वाढविणारे जीवघेणे ‘स्पीड ब्रेकर’! गतिरोधकच ठरताय अपघातांचे कारण

Jalgaon : जळगावसह सराफ बाजार व परिसरात बहुतांश ठिकाणी कॉंक्रिटचे नवीन रस्ते झाले. खड्ड्यांपासून नागरिकांची मुक्तता तर झाली. मात्र, या रस्त्यांवर उभारलेले मोठमोठे गतिरोधकच आता वाहनधारकांच्या जिवावर उठलेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जुन्या जळगावसह सराफ बाजार व परिसरात बहुतांश ठिकाणी कॉंक्रिटचे नवीन रस्ते झाले. खड्ड्यांपासून नागरिकांची मुक्तता तर झाली. मात्र, या रस्त्यांवर उभारलेले मोठमोठे गतिरोधकच आता वाहनधारकांच्या जिवावर उठलेत. या गतिरोधकांची रचना इतकी भयानक आहे की, त्यामुळे वाहनधारकांना सांधे, मणक्यांचे विकार लागल्याशिवाय राहणार नाही. (jalgaon Big speed breaker on road are causes of accidents)

गेल्या काही वर्षांपासून जळगावातील रस्त्यांमधील खड्डे, त्यामुळे झालेल्या दुर्दशेवरुन शहराची ‘खड्ड्यांचे शहर’ अशी वेगळी आणि लाजीरवाणी ओळख निर्माण झाली होती. शहरातील जवळपास सर्वच भागातील रस्त्यांची वाट लागली होती. अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी.

व्हॉल्व्हच्या कामांमुळे तर काही भागात भुयारी गटारांच्या कामाने रस्ते नावाचा घटकच शहरातून बाद झाला होता. जवळपास सहा- सात वर्षे नागरिकांनी रस्त्यांमधील खडड्यांमधून दररोज जिवघेणा प्रवास केला.. त्यामुळे अनेकांना सांधे, मणके दुखीचे विकार जडले. अनेकांचे अपघात होऊन ते कायमचे जायबंदी झालेत..

दोन वर्षांत चित्र बदलले

गेल्या वर्ष- दोन वर्षांत हे चित्र टप्प्याटप्प्याने बदलत गेले. मंजूर व प्राप्त निधीनुसार विविध भागात रस्त्यांची कामे होऊ लागली. जवळपास दोनशे कोटींहून अधिक निधीतून ही कामे टप्प्याटप्प्याने होऊ लागली आहेत. यात नागरी वस्त्यांसह विविध वाढीव वसाहतींमध्येही रस्त्यांची कामे सुरु झालीत. तर शहरातील प्रमुख रस्त्यांसाठीही निधी मंजूर होऊन त्यांचीही कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली. (latest marathi news)

डांबरी रस्ते व कॉंक्रिटीकरण

याअंतर्गत शहरात विविध ठिकाणी डांबरी रस्त्यांची कामे सुरु झाली. त्यापैकी बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी अद्यापही काही रस्त्यांची कामे अपूर्णच आहेत. तर काही ठिकाणी कॉंक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले आहे.

रस्त्यांसोबत आले गतिरोधक

जुन्या जळगावातील विविध भागात गेल्या दोन वर्षांत अनेक रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाले. रथचौक, बालाजीपेठ, सराफ बाजारातील काही गल्ल्या, जुने जळगाव, मारोती पेठ, भावसार मढी अशा विविध गल्लीबोळांत रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. परंतु, प्रचंड वर्दळीच्या या रस्त्यांवर वाहनांची गती नियंत्रणात आणण्यासाठी मोठमोठे स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत.

या गतिरोधकांची रचना इतकी जीवघेणी आहे की, कोणतेही वाहन असले तरी त्याचा स्पीड शून्य झाल्यानंतरही वाहन त्यावरुन उधळते. अशा वेळी वाहनधारकाचे लक्ष नसेल तर तो थेट फेकलाच जातो. रथचौकाकडून नेरीनाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असेच गतिरोधक अगदी टप्प्याटप्प्यावर आहेत. तसेच भिलपुरा चौकाकडून सराफ बाजाराकडे येणाऱ्या रथाच्या मार्गावरही असेच जीवघेणे स्पीड ब्रेकर आहेत.

गतिरोधकांना मान्यता नाहीच

राष्ट्रीय महामार्ग असोत, राज्य महामार्ग, जिल्हामार्ग किंवा अन्य रस्त्यांवर खरेतर गतिरोधक टाकणे कायदेशीर नाहीच. अशा सर्वच रस्त्यांवर ज्या ठिकाणी गतिरोधक असतात, ते त्या- त्या ठिकाणच्या रहिवाशांच्या मागणीनुसार टाकलेले असतात. गल्लीबोळातील अथवा वस्त्यांमधील रस्त्यांवर तर मुळातच वाहनांची गती एकदम कमी असते. असे असताना गतिरोधक टाकणे नियमबाह्य आहे.

"राष्ट्रीय अथवा राज्य महामार्गांवर, किंवा कोणत्याही रस्त्यावर गतिरोधक टाकणे तांत्रिकदृष्ट्या योग्य नाही. महामार्ग असतील तर त्या रस्त्यांवर मध्येच कुणीही, कसेही वाहन टाकू नये याचे नियम आहेत. अन्य राज्य व जिल्हा रस्त्यांच्या बाबतीतही तसेच निकष आहेत. रस्त्यांची रचना ‘चंदीगड शैली’ने (ही नगररचना व रस्त्यांच्या रचनेसंबंधी आदर्श शैली आहे) असायला हवी."- प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT