Accident News sakal
जळगाव

Jalgaon Accident News : दुचाकींची समोरासमोर धडक; एक जागीच ठार, दुसरा जखमी

Jalgaon Accident : तालुक्यातील टेहू शिवारात असलेल्या वाकड्या पुलाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जखमी झाला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : तालुक्यातील टेहू शिवारात असलेल्या वाकड्या पुलाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा जखमी झाला. ही घटना सोमवारी (ता. १) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. (bike Accident one dead on spot and other injured )

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या टेहू शिवारातील वाकड्या पुलाच्या जवळपास सोमवारी (ता.१) सायंकाळी सातच्या सुमारास श्याम संभाजी पाटील (वय २८, रा. टेहू, ता. पारोळा) हा तरुण दुचाकीने (एमएच १९ एझेड ३६७६) येत असताना समोरून भरधाव वेगाने येणारी दुसरी दुचाकी (एमएच २०, सीएल ४६४०) वरील चालक विनोद विठ्ठल महाले याने जोरदार धडक दिली.

त्यात श्याम संभाजी पाटील यांचा जागीच मृत्यू तर विनोद महाले व समाधान कैलास अहिरे हे दोघे जखमी झाले. त्यांना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेने पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी पारोळा पोलिसात संजय राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT