NCP District President Adv. Ravindra Patil while interacting with office bearers and workers. esakal
जळगाव

Raver Lok Sabha Constituency : ‘मविआ’कडून 2 दिवसांत उमेदवाराची घोषणा

Jalgaon News : रावेर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून येत्या दोन दिवसांत उमेदवारी जाहीर करण्यात येईल.

सकाळ वृत्तसेवा

यावल : रावेर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून येत्या दोन दिवसांत उमेदवारी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील यांनी मंगळवारी (ता. २) येथे भेट देत येथील तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (Raver Lok Sabha Constituency)

या प्रसंगी रावेर लोकसभा क्षेत्रप्रमुख अतुल पाटील, यावल तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, आदिवासी सेलचे प्रमुख एम. बी. तडवी यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रावेर लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली.

मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवारी घोषित नसल्याने मतदारांमध्ये संभ्रम आहे. रावेर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे असल्याने व पक्षाने अद्यापही उमेदवारी जाहीर केली नसल्याने जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला. यावेळी त्यांनी येत्या दोन दिवसांत उमेदवारी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले.

रावेर लोकसभा मतदार संघासाठी स्वतः ॲड. रवींद्र पाटील, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील, कॉन्ट्रॅक्टर विनोद पाटील हे इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम उमेदवाराचे नाव राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रांताध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार एकनाथ खडसे हे जाहीर करतील, असे सांगितले. (latest marathi news)

गेल्या दहा वर्षांच्या काळात शेतकरी अनेक समस्यांनी ग्रस्त असून, बेरोजगारी महागाई, यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. केंद्रात व राज्यात समविचारी सत्ता असून, कोणतेही प्रश्न सोडले जात नसल्याने जनतेची थट्टा केली जात असल्याचे सांगून मतपेटीद्वारेच मतदार त्याचा निषेध नोंदवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

रावेर लोकसभा मतदार संघासाठी पक्षाकडून कोणाचेही नाव घोषित होणार असले तरी प्रचाराचे राहिलेले दिवस पाहता जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी असल्याने तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे सांगितले.

खडसेंच्या भाजप प्रवेशाचे खंडण

राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या कथित भाजप प्रवेशाचे पाटील यांनी खंडण केले असून, त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा पसरविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाने कोणत्याही उमेदवाराचे नाव घोषित केले तर त्यांच्या पाठीशी आमदार एकनाथ खडसे ठामपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत वाहतुकीस अडथळा आणणार नाही, मराठ्यांनी कसं केलं नियोजन, सरकारही फेल

भरसभेत पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ; मोहम्मद रिझवींनी वापरले अपशब्द, भाजपची काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका

Lionel Messi Retirement: लिओनेल मेस्सीचे निवृत्तीचे संकेत! घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार, संपूर्ण परिवार उपस्थित राहणार

Pune News : पुण्यात कॅबचालकांसाठी 'अभय' योजना सुरू; प्रवांशांकडून वाढीव शुल्क आकारणाऱ्यांवर कारवाई नाहीच

हुंड्यामुळे दर 24 तासांनी 20 महिलांचा मृत्यू! निक्की भाटीच्या मृत्यूने उलघडले गूढ; NCRB च्या आकडेवारीतून भयानक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT