Crime
Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : एटीएममधून पैसे लांबविणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : एटीएम मशीनमधून पैसे बाहेर येण्याच्या जागेवर काळी पट्टी लावून नंतर ते पैसे काढून घेण्याचा प्रकार अमळनेर शहरातील विजय मारुती मंदिराजवळील एटीएममध्ये ३१ मार्चला दुपारी घडला. महेशदत्त मधुकर पाटील ३१ मार्चला दुपारी दोनच्या सुमारास विजय मारुती मंदिराजवळील एटीएममधून २० हजार रुपये काढण्यासाठी गेले. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पैसे निघाले नाहीत. (Jalgaon case registered against two people who withdrew money from ATM)

त्यांनतर सेंट्रल बँकेचे अधिकारी दिलीप खैरनार यांनी एटीएमचे विभागीय प्रमुख महेशकुमार सतीशराव पवार यांना कळवून प्रत्यक्ष एटीएम मशीनवर जाऊन खात्री करायला सांगितली. सोमवारी (ता. १) उमेश हिंमतसिंग पाटील यांनी एक हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचेही पैसे निघाले नाहीत.

अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, त्यांना बाहेर पांढऱ्या रंगाची कार उभी दिसली. त्यात बसलेल्या दोन जणांनी एटीएममधून पैसे बाहेर येण्याच्या ठिकाणी काळी पट्टी लावून अडथळा निर्माण केला होता.

ग्राहक येण्याची वाट पाहत बसायचे आणि ग्राहक पैशांची वाट पाहून थकल्याने परत गेला, की आळीपाळीने पैसे काढायचे. अधिकारी बाहेर गेल्यावर दोघेही कार घेऊन पळून गेले. याबाबत महेशकुमार पवार यांनी दिलेल्या फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिसांत दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार अशोक साळुंखे तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT