Chief Minister Eknath Shinde, Neighbor Guardian Minister Gulabrao Patil, Rural Development Minister Girish Mahajan, while laying the groundwork of Warkari Bhawan. esakal
जळगाव

CM Shinde Jalgaon Daura : प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन व्हावे : एकनाथ शिंदे

CM Shinde Jalgaon Daura : राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान मोठे आहे, वारकरी भवन उभारणे हे चांगले काम आहे.

सकाळ वृत्तसेवा

CM Shinde Jalgaon Daura : राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान मोठे आहे, वारकरी भवन उभारणे हे चांगले काम आहे. जिल्हा नियोजनाच्या निधीतून प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन उभे रहावे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

जिल्हा नियोजन निधीतून जळगाव येथे खेडी भागात कालिकामाता मंदिराजवळ उभारण्यात येणाऱ्या वारकरी भवनाचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. (Jalgaon Chief Minister Eknath Shinde statement Every district should have Varkari Bhavan)

पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेश पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी वारकरी संप्रदायातर्फे गजानन महाराज वरपेकर यांनी वारकरी फेटा बांधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना श्रीविठ्‌ठल रख्मीणीची प्रतिमा देण्यात आली. आमदार सुरेश भोळे यांनी तुकाबोराय व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट दिली. श्री. शिंदे म्हणाले, उत्तर महाराष्ट्रात जळगावात पहिल वारकरी भवन उभे राहत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. (latest marathi news)

या वारकरी भवनासाठी कोणताही निधी पडू दिला जाणार नाही. असे वारकरी भवन प्रत्येक जिल्ह्यात उभे राहिले पाहिजे. वारकरी संप्रदाय हा भजन कीर्तनातून पांडुरंगाचे नामस्मरण करून जनजागृती करीत असतो. आज आम्ही पंढरपूरचाही विकास करीत आहोत. त्यासोबत राज्यातील जेवढी तिर्थक्षेत्रे आहेत, त्यांचाही विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

‘ब’ दर्जाच्या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाने अडीच हजार कोटी रूपयाची तरतूद केली आहे. राज्यातील सरकार पांडूरंगाच्या कृपेनेच उभे राहिले आहे. सर्वसामान्य जनतेच्या आर्शिवाद या सरकारला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हितासाठी हे सरकार काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT